• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2022

साई बिल्डरच्या फरार असलेल्या व्यवस्थापकाचा शोध घेण्यासाठी एमआयएमचे गृहमंत्र्यांना साकडे

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
साई बिल्डरच्या फरार असलेल्या व्यवस्थापकाचा शोध घेण्यासाठी एमआयएमचे गृहमंत्र्यांना साकडे

 मुंबई : सर्वसामान्य रहीवाशांचे पैसे घेवून त्यांना सदनिका देण्याच्या नावाखाली साई बिल्डरकडून फसवणूक करण्यात आली.या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी साई बिल्डरच्या फरार झालेल्या व्यवस्थापकाला अटक करण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडी गेल्या काही महिन्यापासून पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. बुधवारी एमआयएमचे धुळेतील आमदार फारूख शाह,एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कुणाल खरात, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्र्रदेश सरचिटणिस हाजी शाहनवाझ खान यांनी संबंधित रहीवाशांचे शिष्टमंडळ घेवून थेट मंत्रालयावर धडक देत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांना याप्रकरणी तपास  करण्याचे साकडे घातले. फरार  आरोपींचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तांना निर्देश देण्याचे व परराज्यात तात्काळ पोलिस पाठविण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी एमआयएमच्या शिष्टमंडळाला दिले.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील उलवा येथील भुखंड क्रमांक १६९ वर साई बिल्डर बांधत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये सदनिका खरेदीसाठी गुंतवणूक केलेल्या रहीवाशांच्या फसवणूकीबाबत आम्ही आपले लक्ष वेधू इच्छित आहोत. साई बिल्डर हा सिवूडस येथील रहीवाशी असून त्यांनी उलवा येथे भुखंड क्रमांक १६९ वर इमारतीचे बांधकाम सुरू आहे.  या इमारतीमध्ये सदनिका घेण्यासाठी रहीवाशांनी कोणी ३६ लाख, कोणी ११ लाख, कोणी ३ लाख असे बिल्डरला दिलेले आहेत. हा व्यवहार व जमा केलेली रक्कम करोडोंच्या घरात आहे. सदनिकांची कागदपत्रे बनविताना संबंधित बिल्डरने रहीवाशांची फसवणूक करताना बनावट कागदपत्रे बनवून संबंधितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला असून न्यायालयातही प्रकरण सुरू आहे. या गुन्ह्यात बिल्डर पितापुत्राला पोलिसांनी अटक केली असली तरी जामिनासाठी बिल्डर पितापुत्रासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु या फसवणूकीच्या गुन्ह्यातील अजून एक मुख्य सुत्रधार असलेला बिल्डरचा व्यवस्थापक (मॅनेजर) अजूनही फरार आहे. या  व्यवस्थापकाने (मॅनेजर) रहीवाशांकडून कंपनीच्या तसेच स्वत:च्याही नावाने धनादेश व कॅश जमा  केलेली आहे. हा या फसवणूकीच्या साखळीतील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला हा व्यवस्थापक (मॅनेजर) फरार असणे म्हणजे गुंतवणूक केलेल्या रहीवाशांसाठी धोकादायक बाब आहे. हा झारखंड येथे फरार झाल्याचे या प्रकरणात फसवणूक झालेल्या रहीवाशांचे म्हणणे आहे. पोलिस या मॅनेजरचा गंभीरपणे शोध घेत नसल्याने अजून त्याला अटक झाली नसल्याचे संबंधित प्रकरणातील बाधित रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. उद्या या पितापुत्राला जामिन मिळाल्यास व या मॅनेजरसोबत ते अन्यत्र फरार झाल्यास बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या रहीवाशांना कधीही न्याय मिळणार नाही व त्यांच्या घामाचेही पैसे कधीही परत मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणात फरार असलेल्या बिल्डरच्या मॅनेजरला अटक करावी आणि फसवणूक झालेल्या रहीवाशांना त्यांच्या सदनिका अथवा गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नाहीत तोपर्यत या बिल्डर पितापुत्राला जामिन मिळू नये यासाठी न्यायालयात प्रयत्न करावेत. व्यवस्थापक फरार असणे म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित रहीवाशांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सरचिटणिस हाजी शाहनवाझ खान यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त,  गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि आर्थिक व्यवहार शाखेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तथापि कामात प्रगती न  दिसल्याने स्थानिक रहीवाशांना घेवून हाजी शाहनवाझ खान यांनी एमआयएमचे धुळेतील आमदार फारूख शाह,एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप  वळसेपाटील यांची मंत्रालयात भेट घेतली.  रहीवाशांच्या व्यथा मांडल्या व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन एमआयएमच्या शिष्टमंडळाला दिले. गृहमंत्र्यांनी एमआयएमच्या शिष्टमंडळाला रहीवाशांना घेवून आपल्या बंगल्यावर येण्याचे निमत्रंण दिले. बंगल्यावर सविस्तरपणे चर्चा करून रहीवाशांना न्याय मिळवून देवू असे गृहमंत्री वळसेपाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

मूषक नियत्रंण विभागाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : संदीप खांडगेपाटील

Next Post

शहरातील उद्याने नवी मुंबईकरांसाठी खुली करा : रविंद्र सावंत

Next Post
फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

शहरातील उद्याने नवी मुंबईकरांसाठी खुली करा : रविंद्र सावंत

सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडवा : पांडुरंग आमले

सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडवा : पांडुरंग आमले

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com