• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 9, 2022

बामणदेव मार्गाचे स्वच्छता अभियान उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
बामणदेव मार्गाचे स्वच्छता अभियान उत्साहात

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पामबीच मार्गावर सारसोळे खाडीअंर्तगत भागात असणाऱ्या बामणदेवाकडे जाणाऱ्या मार्गाच्या स्वच्छतेविषयीचे अभियान मंगळवारी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडले.

नवी मुंबईतील ग्रामस्थांमध्ये सारसोळे खाडीमध्ये असणारे बामणदेव दैवत हे श्रध्देचा व जागरूक देवस्थान मानले जाते. नवसाला पावणारा बामणदेव अशी या देवाची नवी मुंबई शहरात ख्याती आहे. खाडीमध्ये मासेमारी करावयास गेल्यावर बामणदेवच आपले रक्षण करतो, अशी येथील ग्रामस्थांची श्रध्दा आहे. बामनदेवाकडे जाणारा मार्ग आजही खाचखळग्यांचा व कच्चा आहे. पावसाळ्यात येथे मानेपर्यत तर कोठे कमरेपर्यत जंगली गवत वाढलेले असते.

बामनदेव हा शंकराचा अवतार मानला जात असल्याने सारसोळेचे ग्रामस्थ हे गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिवशी  गावातील युवकांनी स्थापन केलेल्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. या भंडाऱ्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल-उरण भागातून भाविक मोठ्या संख्येने, मनोभावे सहभागी होत असतात. हा मार्ग पावसानंतर जंगली गवताचा बनल्याने भंडाऱ्याअगोदर काही दिवस या मार्गावर कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ सफाई करून स्वच्छता करतात. दरवर्षी ग्रामस्थ, पोलिस, महापालिका, वनविभाग यांच्या संयुक्त विभागाने या ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत असते.

मंगळवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात नवी मुंबई महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, जनसेवक व नेरूळ भाजपाचे नेते गणेशदादा भगत, पर्यावरणप्रेमी विनायक गिरी,  समाजसेवक गुरू म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार, शिववाहतुक सनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांच्यासह कोलवाणी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि सारसोळे ग्रामस्थ या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभागी झाले होते.

Previous Post

सोसायटी आवारात कंपोस्ट खत बनविण्याच्या महापालिका निर्णयाची सक्ति करू नका : रविंद्र सावंत

Next Post

नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून नेरूळमध्ये निषेध

Next Post
नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून नेरूळमध्ये निषेध

नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून नेरूळमध्ये निषेध

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मूषक नियत्रंण विभागाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : संदीप खांडगेपाटील

साई बिल्डरच्या फरार असलेल्या व्यवस्थापकाचा शोध घेण्यासाठी एमआयएमचे गृहमंत्र्यांना साकडे

साई बिल्डरच्या फरार असलेल्या व्यवस्थापकाचा शोध घेण्यासाठी एमआयएमचे गृहमंत्र्यांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com