• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 11, 2022

तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

Navimumbailive.com@gmail.com

नवी  मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानाचे तुटलेले दरवाने, तुटलेली तसेच निखळून पडलेली खेळणी, मॉर्निग वॉकच्या उखडलेल्या लाद्या याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही काहीच फायदा होत नाही. आयुक्त कार्यालयाकडून समस्या निवारणासाठी संबंधितांना तक्रारी केवळ फॉरवर्ड करण्याचे काम केले जात आहे. समस्यांचे निवारण होत नाही. तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का?  असा प्रश्न पत्रकार व नेरूळ सेक्टर सहामधील स्थानिक रहीवाशी संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना विचारला आहे.

या समस्येबाबत पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना ११ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारपत्र दिले. ते तक्रारपत्र आयुक्त कार्यालयाने “Executive Engineer (Nerul)” <ee_nerul@nmmconline.com>,
Sanjay Desai cityengineer@nmmconline.com यांना फॉरवर्ड केले. महिन्याभरात काहीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारपत्र सादर केले. आयुक्त कार्यालयाकडून ते तक्रारपत्र तात्काळ  Sanjay Desai <cityengineer @nmmcon     line.com>, Executive Engineer (Nerul) < ee_nerul@nmmconline.com यांना फॉरवर्डही केले. सुधारणा शून्य. उलट १९ दिवसात काम न झाल्याने बदकाचे गोलाकार खेळणे आता जागेवरून बाजूला पडले असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून ११  जानेवारी २०२२ रोजी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात महानगरपालिकेने एकेकाळी शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केलेली आहे. या तानाजी मालुसरे क्रिडांगणाला व जिजामाता उद्यानाला गेल्या काही महिन्यापासून बकालपणा येवून एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या उद्यानाच्या वरूणा व एव्हरग्रीन सोसायटीच्या बाजूने असलेले उद्यानाचे व क्रिडांगणाचे दरवाजे तुटून गळून पडलेले आहेत. येथील लहान मुलांची खेळणी नावाला असून या खेळण्यांची थडगी झाली आहेत. लहान मुलांचे झोपाळे पूर्णपणे तुटलेले आहेत. त्याचा खेळण्यासाठी काहीही वापर होत नाही , तर तो सांगाडा काय स्वच्छ भारत अभियानात दाखविण्यासाठी पालिका प्रशासनाने ठेवला आहे काय? तीच अवस्था लहान मुलांच्या खेळण्यातील बदकाची आहे. त्यातील एक बदक नाहीसा झालेला आहे. आता तर १९ दिवसात पालिका प्रशासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्याने बदकाचे खेळणे जागेवरून निखळून बाजूलाच पडलेले आहे.

उद्यानात उंदरांनी ठिकठिकाणी खड्डे घेतले असून उद्यान व क्रिडांगणाला सुरक्षा रक्षक देण्यात आलेला नाही. उद्यान व क्रिडांगणात मोकाट व भटकी कुत्री वावरत असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे असे प्रकार दररोज घडत आहेत. तसेच उद्यान व क्रिडांगणात  परिसरातील रहीवाशी त्यांची पाळीव कुत्री फिरावयास आणत असून ज्या ठिकाणी मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, त्याच मार्गावर कुत्र्यांचे शौच पहावयास मिळते. सुरक्षा रक्षक ठेवल्यास उद्यानात फिरणाऱ्या महिला व मुलींना सुरक्षिततताही प्राप्त होईल. मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, तेथील लाद्याही उखडल्या गेल्या आहे. या मॉर्निग वॉकच्या लाद्याही तुटलेल्या असतील तेथे नव्याने बसविण्यात याव्यात. उद्यान व क्रिडांगणाच्या दुरावस्थेबाबत आपण तातडीने उपाययोजना करून तेथील बकालपणा हटवावा. झोपाळा व बदकाची दुरूस्ती, तुटलेल्या दोन्ही प्रवेशद्वाराची दुरूस्ती करण्यात यावी, उद्यानात सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्यावा. भविष्यात महिलांची छेडछाड, विनयभंग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटवून बकालपणा घालविण्यासाठी व सुविधा तातडीने पुरविण्यासाठी संबंधितांना देण्याची मागणी करताना पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी समस्येचे गांभीर्य महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

Next Post

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्षांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

Next Post
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्षांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्षांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट

खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट

एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

प्रभाग ७६ मध्ये धुरीकरण तसेच गटारांची तळापासून सफाई करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com