• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 1, 2021

अतिवृष्टीनंतरच्या मदतकार्यातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्रांचा मुख्यालयात विशेष सन्मान

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
अतिवृष्टीनंतरच्या मदतकार्यातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्रांचा मुख्यालयात विशेष सन्मान

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : जुलै महिन्यात कोकणासह इतर भागाला बसलेल्या जलवृष्टीच्या तडाख्यातून तेथील जनजीवनाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे तत्पर कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता, वैद्यकीय, अग्निशमन पथके महाड. चिपळूण, कोल्हापूर भागात आवश्यक साधनसामुग्री व औषधसाठ्यासह रवाना झाली. त्यांनी समर्पित भावनेने त्याठिकाणी केलेल्या अथक मदतकार्याची दखल तेथील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरणे तसेच प्रसार माध्यमांकडूनही मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. तेथील नागरिकांनी सोशल मिडीयावरूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकांच्या सेवाभावी कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले.

अशाप्रकारे इतरांच्या अडचणीच्या प्रसंगात धाव घेत त्याठिकाणी सेवाभावी वृत्तीने मदतकार्य करणाऱ्या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा महानगरपालिकेमार्फतही सन्मान व्हावा या भूमिकेतून महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथएटरमध्ये ३७४ स्वच्छताकर्मी आणि ३० महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच ११ वैद्यकीय पथकातील डॉक्टर्स, ब्रदर व सहकारी त्याचप्रमाणे ११ अग्निशमन अधिकारी व जवान अशा ४०० हून अधिक आपत्कालीन मदतकार्य पथकात सहभागी अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांचा स्नेहभेट व प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त डॉ. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा मदतकार्य कार्यवाहीचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त सर्वश्री मनोजकुमार महाले, जयदीप पवार, डॉ. श्रीराम पवार, ऐरोलीचे विभाग अधिकारी महेंद्र सप्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आहेर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेद्र सोनावणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी पूरग्रस्त भागात सेवाभावी वृत्तीने केलेल्या कामामुळे महानगरपालिकेची मान उंचावलेली असून याची दखल घेत आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले. हे मदतकार्य सर्वांनाच अधिक चांगल्या कामाची प्रेरणा देणारे असून आजचा हा सन्मान सोहळा आपल्यातील जिव्हाळ्याचे नाते घट्ट करणारा कौटुंबिक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रदूषणमुक्त स्वच्छ व पर्यावरणशील दिवाळी साजरी करण्याची सामुहिक शपथ अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचेसमवेत सर्वांनी घेतली. महापालिका प्रशासनाने चांगल्या कामाची दखल घेऊन विशेष सत्कार केल्याबद्दल सत्कारमूर्तींनी समाधान व्यक्त केले व यामुळे अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे नमूद केले.

Previous Post

शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारेंच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप

Next Post

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा सीबीडी बेलापुरमधील सिडको भवनात आत्महत्येचा प्रयत्न

Next Post
सर्वसामान्य नागरिकांसह लहान व मध्यम विकासक आणि व्यावसायिकांकरिता आणली  भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची सिडकोची भव्य योजना

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा सीबीडी बेलापुरमधील सिडको भवनात आत्महत्येचा प्रयत्न

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील

बळीराजाच्या घरी दिवाळी कधी साजरी होणार?

बळीराजाच्या घरी दिवाळी कधी साजरी होणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com