• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 25, 2021

बिग बॉस चर्चा केवळ स्नेहा वाघचीच अर्थात सरांगेची

adminbyadmin
in टॉप न्यूज, महाराष्ट्र
0
बिग बॉस चर्चा केवळ स्नेहा वाघचीच अर्थात सरांगेची

मनोरंजन प्रतिनिधी : प्रशांत पांचाळ

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : कलर्स वाहिनीवर सध्या ‘बिग बॉस सिझन थ्री’ हा चांगलाच रंगतदार बनत चालला असून टीआरपीचा प्रेक्षक वर्गही बिग बॉसकडे चांगलाच खेचत चालला आहे. अन्य दोन बिग बॉस पर्वाच्या तुलनेत यंदाचा बिग बॉस थ्रीचा खेळ फारसा मनोरंजक नसल्याची खंतही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या बिग बॉसच्या पर्वात खेळ कमी व धांगडधिंगाच अधिक चालला आहे. खुद्द यंदाच्या बिग बॉस थ्रीबाबत या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकरच फारसे समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे. या बिग बॉसमध्ये अनेक महिला सहभागी असल्या तरी चर्चेचा फोकस  मात्र स्नेहा वाघ भोवतीच फिरताना दिसत आहे. चर्चेत नेटकऱ्यांच्या ट्रोलच्या पसंतीमध्येही, टीकेमध्ये स्नेहा वाघच केंद्रस्थानी दिसत आहे.

स्नेहा वाघचा ‘सरांगे’ या कोरिअन शब्दावरून वादंग निर्माण झाले आहे सरांगे म्हणजेच आय लव्हयू असा अर्थ आहे. आधीचे दोन लग्न मोडलेली स्नेहा वाघ आता कोणाच्या प्रेमात पडली आहे. जय दुधाणेंनी वाढती जवळळीक पाहता जय दुधाणे तिचा तिसरा साथीदार बनणार नाही ना, असाही सोशल मिडियावर चर्चेचा सूर आळविला जात आहे.

दररोज सकाळी उठताना गाणे लागल्यावर स्नेहा रोज बिग बॉसच्या घरातील कॅमेऱ्याकडे पाहून बघुन ‘सरांगे बिग बॉस…सरांगे’ असं म्हणते. यावरूनच स्नेहा वाघच्या नावाने नेटेकऱी मोठ्या प्रमाणावर भन्नाट मीम्सचा वर्षाव करत आहेत आणि आता हे मीम्स प्रचंड वायरल देखील होत आहे. ‘सरांगे’ (saranghae) हा शब्द कोरिअन असून या शब्दाचा अर्थ ‘आय लव्ह यू’ असा आहे. पण याआधी या शब्दाचा अर्थ लोकांना माहिती नव्हता. त्यामुळे ही काय बोलतेय हे लोकांच्या लक्षात येत नव्हते. अगोदर कोणाला सरांगे या शब्दाचा बोधच होत नव्हता. नंतर प्रेक्षकांना या शब्दाचा अर्थ समजला, पण तोपर्यंत नेटकऱ्यांनी तिच्यावर मीम्स तयार करायला सुरुवात केली. तर काहींनी ‘बिग बॉसचा, मराठी पर्व चालवत आहात की कोरियन पर्व?? मराठी भाषेचा मान हा ठेवला पाहिजे हे आपण कृपया स्नेहा वाघला सांगावे,कारण लोक आता सरांगे ऐकून कंटाळले आहेत.’असं एकाने व्टिट केलं आहे.

पहिले तिचे अयशस्वी ठरलेले दोन लग्न , नंतर तिची आणि जय दुधाणेची वाढलेली मैत्री यांमुळे ती नेहमीच चर्चेचा भाग ठरली आहे. पण आता नेटेकरी स्नेहाची वेगळ्याच कारणांवरुन मजा घेत आहे.

स्नेहाने वयाच्या १९ व्या वर्षी अविष्कार दार्वेकसोबत लग्न केलं होत. पण अगदी कमी कालावधीतच त्यांचा घटस्फोट झाला. विशेष स्नेहा वाघचा पहिला पती आविष्कारही बिग बॉसच्या या खेळात सहभागी झाला आहेे. स्नेहा व जयशी वाढती जवळीक आणि त्याचवेळी आविष्कार मारला जाणारा कॅमेरा यानंतर आविष्कार काही बोलत नसला तरी त्यांचा चेहरा मात्र खूप काही बोलून जात असतो. आविष्कारशी काडीमोड झाल्यानंतर २०१५ मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी लग्न केलं, पण लग्नाच्या आठ महिन्यानंतरच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता बिग बॉसच्या घरात स्नेहाची जयसोबतच्या वाढलेल्या बॉडिंगवर काही प्रेक्षकांनी नापसंती दर्शविली आहे. सध्या बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन चांगलाच रंगला आहे. सोशल मीडियावर शो आणि त्यातील स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात.  तसेच स्पर्धकांच्या घरातील वावरामुळे ते सतत ट्रोल देखील होत असतात. तर सध्या बिग बॉसच्या घरातील स्पर्धक स्नेहा वाघ चांगलीच ट्रोल होत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच स्नेहा नेटेकऱ्यांच्या रडारवर आहे.

Previous Post

नानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही : लोककलावंत कडूबाई खरात

Next Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

Next Post
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

सामुहिक प्रतिज्ञेने दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

सामुहिक प्रतिज्ञेने दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

आता कोव्हीड १९ दुसऱ्या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com