• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2021

साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातम्यांसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडको महामंडळाने साडे बारा टक्के योजने अंतर्गत नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांना किंवा त्यांच्या वारसांना करण्यात येणारे जमिनीचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून सिडकोचे मुख्यालय असलेल्या, सिडको भवन येथील सातव्या मजल्यावरील साडे बारा टक्के योजना कार्यालयाचे स्थलांतर तळ मजल्यावर करण्यात आले आहे. या विभागाचे उद्घाटन सोमवारी, १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे,  मुख्य भूमी व भूमापन अधिकारी अजिंक्य पडवळ व अन्य अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

नवी मुंबई विकसित करण्याकरिता शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची १९७० मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती. नवीन शहर विकसित करण्याकरिता सिडकोकडून स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पबाधितांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा याकरिता साडे बारा टक्के ही अभिनव योजना अस्तित्वात आली. या योजने अंतर्गत नवी मुंबई प्रकल्पबाधितांना मोबदला म्हणून त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या साडे बारा टक्के विकसित जमीन देण्यात येते.

सिडकोकडून अत्यंत पारदर्शक व नियोजनबद्धरीत्या ही योजना राबविण्यात येऊन, आजतागायत नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील बहुतांशी प्रकल्पबाधितांना किंवा प्रकल्पबाधित व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या वारसांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पबाधितांना या योजने अंतर्गत जमीन वाटपाची प्रक्रिया येत्या दीड वर्षात सिडकोकडून पूर्ण करण्यात येणार आहे. सिडकोकडून द्रोणागिरी नोडमधील जमिन संपादित करण्याचे काम सुरू असून सदर जमिनींच्या मोबदल्यात तेथील प्रकल्बाधितांना जासई येथे विकसित भूखंड प्रदान करण्यात येतील. यासाठी जासई येथे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

साडे बारा टक्के योजने संदर्भातील कामांसाठी सिडको मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीचे पडावे म्हणून, या योजनेचे सिडको भवन इमारतीत असलेले सातव्या मजल्यावरील कार्यालय तळ मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले असून नवीन कार्यालय हे सुसज्ज व अधिक प्रशस्त जागेत असून कार्यालयाबाहेर आसन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प इ. सुविधा आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनाही हे नवीन कार्यालय अधिक सोयीचे पडणार आहे.

Previous Post

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

Next Post

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

Next Post
राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

इंटकच्या प्रयत्नांमुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी

इंटकच्या प्रयत्नांमुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी

महापालिका कर्मचाऱ्यांना दिली स्वच्छतेची शपथ

महापालिका कर्मचाऱ्यांना दिली स्वच्छतेची शपथ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com