• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2021

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ ( केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com 

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मे महिन्यात कोकण किनारपट्टीसह गुजरातलाही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. कोकणात या चक्रीवादळाने अपरिमित हानी केली होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि बैठक घेऊन गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. शेजारच्या महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असताना देशाच्या पंतप्रधानांनी त्याची दखलही घेतली नाही, महाराष्ट्राशी केंद्र सरकारने दुजाभाव केला. त्यानंतरही राज्याने केंद्राकडे मदत मागितली परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. राज्यातील भाजपा नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे ती रास्तच आहे पण केंद्र सरकारकडे जाऊन या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. त्यासाठी भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी.

**  परमविरसिंह यांना परदेशी पळून जाण्यात केंद्राची मदत ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, परमवीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला.

 ** सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

बसपाचे लोकसभा उमेदवार किशोर वरक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय नानू कदम, तालुकाध्यक्ष भाई सावंत यांनी समर्थकांसह काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी आ. विकास ठाकरे, माजी आ. हुस्नबानु खलीफे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. राजु वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत गावडे, युवा नेते विशाल मुत्तेमवार व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईत कोरोनाचे आज ५६ रूग्ण

Next Post

औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या : अजित पवार

Next Post
औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या : अजित पवार

औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या : अजित पवार

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन

थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देणारी अभय योजना १ ऑक्टोबरपासून सुरु

थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देणारी अभय योजना १ ऑक्टोबरपासून सुरु

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com