• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2021

महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-१७ महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा

adminbyadmin
in Uncategorized
0
महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-१७ महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जाणाऱ्या फुटबॉलच्या फिफा – १७ वर्षाखालील महिला विश्वचषक (FIFA U-17 Womens’ World Cup) स्पर्धेचे यजमानपद भारत देश भूषविणार आहे. तत्पूर्वी महिला आशियाई करंडक स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये संपन्न होत आहे. या दोन्ही जागतिक स्तरावरील स्पर्धा भारतात आयोजित केल्या जात असून महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला २०१७ मधील फिफा – १७ वर्षाखालील पुरूष विश्वचषक स्पर्धेप्रमाणे याही वर्षी या जागतिक स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
या स्पर्धांच्या पूर्वतयारीबाबत विचारविनीमय करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न झाली. याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोज महाले, फिफा अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धा २०२२ आणि महिला आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धा २०२२ चे प्रकल्प संचालक अंकुश अरोरा व श्रीम. नंदिनी अरोरा, होस्ट सिटी मॅनेजमेंट प्रमुख मनदीप सहारन, डी.वाय.पाटील क्रीडा समुहाचे संचालक वृंदावन जाधव, महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतात खेळविली जाणारी महिला आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धा २०२२ तसेच फिफा – १७ वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा कोव्हीडविषयक सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून आयोजित केली जाणार असून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील प्रमुख सामने खेळवले जाणार आहेत.
या सामन्यांपूर्वी जगभरातून येणाऱ्या नामांकीत खेळाडूंना सराव करण्यासाठी फुटबॉल ग्राऊंडची गरज असून ती क्रीडांगणेही आंतरराष्ट्रीय दर्जाची असणे गरजेचे आहे. याकरिता फिफा आयोजन समितीने नवी मुंबईतील ४ तसेच खारघरमधील २ मैदानांची सरावासाठी निवड केली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १९ नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचा समावेश आहे.
या क्रीडांगणामध्ये महानगरपालिकेने २०१७ मध्ये फिफा – १७ वर्षाखालील पुरूष विश्वचषक स्पर्धेच्या सरावासाठी तयार केलेल्या फुटबॉल ग्राऊंडची प्रशंसा त्यावेळी न्यूझिलंड, इंग्लड, स्पेन, ब्राझिल, बाली, टर्की अशा नामांकीत संघातील खेळाडूंनी सरावादरम्यान केली होती. तशाच प्रकारे यावेळीही स्पर्धांकरीता नवी मुंबई महानगरपालिका यजमान शहर म्हणून संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी फिफा आयोजकांना दिला.
या स्पर्धांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने सोमवार दि. १६ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची संयुक्त पाहणी करावी आणि तेथील आवश्यक सुविधांचा आढावा घ्यावा असे निर्देश आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. क्रीडांगणाची स्थिती आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी करणेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्याची दक्षता घेण्याचे व स्पर्धेपूर्वी १ महिना आधी ड्रेसींग रूम, फ्लड लाईट्स अशा अनुषांगिक सर्व सुविधांसह क्रीडांगण सज्ज राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी आदेशित केले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याचा मान नवी मुंबई महानगरपालिकेला मिळणे ही शहरातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असून स्पर्धांच्या अनुषंगाने सोयीसुविधा, सुशोभिकरण तसेच स्पर्धांच्या व्यापक प्रचार प्रसिध्दीतही महानगरपालिका पुढाकार घेईल असे आयुक्तांनी फिफा व एएफसी आयोजक समुहाला आश्वासित केले. 

Previous Post

स्व. शाहूराज सोळसकर स्मरणार्थ शनिवारी रक्तदान शिबिर

Next Post

देशाच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने भाजपाकडून विद्यार्थ्यासाठी स्पर्धाचे आयोजन

Next Post
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवारी साई भक्त महिला  फांऊडेशनचे ‘आषाढी वारीला येताय ना’

देशाच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने भाजपाकडून विद्यार्थ्यासाठी स्पर्धाचे आयोजन

महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

फोर्टीस रूग्णालयात महापालिकेचा कोटा पूर्ववत करण्याची रतन मांडवेंची मागणी

फोर्टीस रूग्णालयात महापालिकेचा कोटा पूर्ववत करण्याची रतन मांडवेंची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com