• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2021

पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्यावी : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने तळईसह इतर गावात दरडी कोसळून मोठी जीवीत व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केलेली असली तरी झालेले नुकसान पाहता वाढीव मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ३ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत जाहीर केलेली आहे.या मदतीचा शासन आदेश अद्याप निर्गमित झाला नसल्याची आपली माहिती आहे. मी स्वतः महाड, चिपळूण या अतिवृष्टीग्रस्त भागाचा ४ व ५ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा करून स्थानिकांशी संवादही साधला आहे.अतिवृष्टीमुळे शेती, मच्छीमार व्यावसायीक, दुकानदार, घरांची मोठी हानी झालेली आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी त्यात वाढ करण्याची गरज आहे.पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात आहे,यासंदर्भात विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तातडीने विना विलंब नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्देश द्यावेत. पशुधन, शेती अवजारे, बियाणे मोफत द्यावेत. वाहून व खरडून गेलेल्या शेतीची तातडीने दुरुस्ती करावी. व्यावसायीकांनाही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यास सहकार्य मिळत नाही. या व्यावसायिकांना आयकर भरण्यासाठी सवलत वा मुदतवाढ मिळावी. शक्य असल्यास जीएसटी माफ करावा किंवा कर भरण्यासाठी मुदतवाढ वा सवलत द्यावी. या व्यावसायीकांना राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांकडून २ टक्के दराने कर्जपुरवठा मंजुर करावा, मंजुर केलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा शक्य असल्यास शासनाने भरावा. टपरीधारकांना वाढीव अर्थसहाय्य मिळावे, दुधाळ जनावरे, मेंढी, बकरी, गाढव, कुक्कुटपालन पक्षी यांच्याकरीता मंजूर केलेल्या प्रति कुटुंब नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी. मत्सबोटी व जाळीसाठी मंजूर केलेल्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करावी, बाधीत कुटुंबांना कपडे, भांडी, घरगुती वस्तु यासाठी वाढीव सानुग्रह अनुदान मंजूर करावे. घरांच्या पडझडीबाबत शासनाने मंजूर केलेल्या मदतीमध्येही वाढ करावी.

महाड व चिपळूण भागातील गंधारी, सावित्री, वशिष्टी नद्यांचे खोलीकरण करणे, नैसर्गिक चक्रीवादळे, अतिवृष्टी, महापूर, डोंगराचे भूस्खलन यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घ्यावी. गंधारी, विशिष्ठी, सावित्री नद्यांच्या खोलीकरण व नदी पात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या मेरी, जलसंधारण विभागाअंतर्गत असलेल्या नेरी या संस्थांचा सहभाग घ्यावा, अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केल्या आहेत.  

Previous Post

शुक्रवारी नवी मुंबईत ४४ कोरोनाचे नवे रूग्ण, एकाचा मृत्यू

Next Post

नवी मुंबई महापालिकेच्या तत्पर मदत कार्यवाहीची महाड, चिपळूण, कोल्हापूरकरांकडून प्रशंसा

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या तत्पर मदत कार्यवाहीची महाड, चिपळूण, कोल्हापूरकरांकडून प्रशंसा

नवी मुंबई महापालिकेच्या तत्पर मदत कार्यवाहीची महाड, चिपळूण, कोल्हापूरकरांकडून प्रशंसा

कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिकेतील सफाईमित्रांचे नवी मुंबई महापालिकेत प्रशिक्षण उत्साहात

कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिकेतील सफाईमित्रांचे नवी मुंबई महापालिकेत प्रशिक्षण उत्साहात

कोकणात शासकीय वैद्यकीय विद्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विद्यालय, विधी विद्यालय मंजूर करा : हाजी शाहनवाझ खान

कोकणात शासकीय वैद्यकीय विद्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विद्यालय, विधी विद्यालय मंजूर करा : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com