• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2021

माणिकराव जगतापांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
माणिकराव जगतापांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला : नाना पटोले

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmailcom

मुंबई : महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोनाने अनेक निकटवर्तीयांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. माणिकराव कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांचा निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. माणिकराव हे उत्तम वक्ते, कुशल संघटक होते. ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत, लोकांचे प्रश्न हिरीरीने मांडत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी असताना एनएसयुआयमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी महाड मतदार संघातून विजय संपादन केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

Previous Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करावी : नाना पटोले

Next Post

पाँर्न अँप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा

Next Post

पाँर्न अँप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा

महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची मागणी

महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची मागणी

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने प्रभाग ८४ मध्ये मनपाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने प्रभाग ८४ मध्ये मनपाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com