• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2021

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साई भक्त महिला फांऊडेशनची आषाढी वारी उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साई भक्त महिला फांऊडेशनची आषाढी वारी उत्साहात

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : आषाढी  एकादशीनिमित्त सानपाडा प्रभाग ७६ मध्ये संततधार वरूण राजाच्या उपस्थितीत भाविकांनी आषाढी वारी उत्साहात काढली. या वारीमध्ये बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वच उत्साहात सहभागी झाले होते.

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवार, दि. २० जुलै रोजी साईभक्त महिला फांऊडेशनच्या वतीने भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आषाढी वारीला येताय ना’ या अभियानांतर्गत आषाढी वारीचे आयोजन केले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही भाविकांना, वारकऱ्यांना विठू रायाचे पंढरीला जावून दर्शन घेता आले  नाही. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्याही दिंडीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे भाविकांची विठू दर्शनाची आस, वारीची परंपरा सानपाड्यातच प्रातिनिधिक स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी कोरोना  महामारीच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत  साई भक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी या वारीचे नियोजन केले होते. समाजसेवक  पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेली ही आषाढी वारी अभंगाच्या गजरात पार पडल्याचे समाधान स्थानिक रहीवाशांनी व्यक्त केले.

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साईभक्त महिला फाउंडेशन यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त दिंडीचे नियोजन करण्यात आले होते.  या दिडींत  सेक्टर २ ३ ४ व ८ या सेक्टरमधून सोशल डिस्टन्स चे पालन करून, टाळ मृदंग च्या गजरात, वारकऱ्यांच्या पताका घेऊन, महिला, लहान मुले, भाविक मोठ्या संख्येने तुळशी वृंदावन घेऊन, कलश घेऊन, बालक पारंपारिक वेशभूषा करून दिडींत सहभागी झाले होते. दिडींमध्ये विठ्ठल रखुमाई, तुकोबा माऊली,  वासुदेव आदी प्रतिकात्मक रूपात सहभागी झाल्याचे चित्रही यावेळी दिडींदरम्यान निर्माण झाले. दिडींत महिलांनी फुगड्या खेळत दिडींतील पारंपारिकता जोपासण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्या, स्थानिक  रहीवाशी, पोलीस अधिकारीही दिडींत विठू माऊलींच्या दर्शनासाठी सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.

ओपीजी टॉवरसमोरून सकाळी ११ वाजता ही दिंडी निघालेली या दिडींची सानपाडा पोलीस स्टेशनमागील गणेश मंदिराजवळ सांगता झाली. त्याच ठिकाणी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना फराळ म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. दिडींमुळे संपूर्ण प्रभाग सांप्रदायिक विठुरायाच्या जयघोषात भक्तिसागरात रममाण झाला व सानपाड्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीचा महापुर ओंसडून वाहिलेला स्थानिक रहीवाशांना सहभागातून पाहता आला. या दिंडी सोहळ्याच्या आयोजनाचा हेतू  मुसळधार पाऊस असतानाही भाविकांच्या सहभागामुळे यशस्वी झाला असल्याची माहिती आयोजक व साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी दिली.

Previous Post

विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अट शिथिल करून अन्य सक्षम पुरावे ग्राह्य धरण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

नवी मुंबईत आज कोरोनाचे ९९ रूग्ण, २ मृत्यू

Next Post
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

नवी मुंबईत आज कोरोनाचे ९९ रूग्ण, २ मृत्यू

पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन २०२१ चे मानकरी

पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन २०२१ चे मानकरी

विद्यार्थी संघटनांना विश्वासात घेवून समस्यांचे निवारण करणार : ना. उदय सामंत

विद्यार्थी संघटनांना विश्वासात घेवून समस्यांचे निवारण करणार : ना. उदय सामंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com