• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2020

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

adminbyadmin
in Uncategorized
0
उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८

*  १५ ते २० जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवानी

*  सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग

पनवेल : क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये १५ ते २० जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव पार पडणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून    जय्यत तयारी सुरू आहे. बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी भाजप नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार राजूदादा पाटील, आमदार महेंद्र थोरवे आदींची उपस्थिती असणार आहे. तर सिने अभिनेत्री जुई भेंडखळे हिची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 

बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँड यांचा गाण्यांचा कार्यक्रम, क्रांतिवीर कला मंच विकी जाधव व शालेय नृत्याविष्कार सादर होणार आहे. गुरुवारी १६ जानेवारीला ‘लिंबू कापला’ फेम मयूर नाईक व ‘आगरी झुझू किंग’ रणजीत ठाकूर यांच्या आगरी गाण्यांचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर यावेळी एकेरी खुली नृत्य स्पर्धा देखील पार पडणार आहे. शुक्रवार, दि. १७ जानेवारी रोजी ‘याल तर हसाल’ फेम संजीवन म्हात्रे हे मनोरंजनातून श्रोत्यांचे प्रबोधन करणार आहेत. शनिवार, दि. १८ जानेवारी रोजी ‘एकच वादा राजु दादा’ फेम परमेश माळी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी मिस रायगड स्पर्धा होणार आहे. रविवार, दि. १९ जानेवारी रोजी स्टेपआर्ट प्रस्तुत जल्‍लोष सुवर्ण युगाचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच पापलेट फेम चिंतामणी शिवडीकर, मेल-फिमेल आवाज फेम मोहन फुंडेकर हे आपली कला सादर करणार आहेत. सोमवार, दि. २० जानेवारी रोजी देविदास पाटील प्रस्तूत रुप कला ऑर्केस्ट्रा, माझ्या देवाच नाव गाजतय फेम रोहित पाटील, द्रवेश पाटील यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.  नागरिकांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, निलेश भोपी, विजय भोपी, सुशांत वेदक यांनी केले आहे.

Previous Post

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

Next Post

उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होतोय नेरूळला आगरी-कोळी महोत्सव

Next Post
उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होतोय नेरूळला आगरी-कोळी महोत्सव

उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होतोय नेरूळला आगरी-कोळी महोत्सव

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – आ.सौ.मंदाताई म्हात्रे

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com