• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2019

नवी मुंबईमधील पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द करणेबाबत आ. मंदाताई म्हात्रेंना साकडे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईमधील पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द करणेबाबत आ. मंदाताई म्हात्रेंना साकडे

सुवर्णा खांडगगेपाटील : navimumbailive.com@gmail.com

पेट्रोल-डीजेल डीलर्स शिष्टमंडळाने घेतली बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट

नवी मुंबई:- नवी मुंबईतील पेट्रोल – डीजेलचे दर हे नवी मुंबईच्या बाहेरील दरापेक्षा जास्त असल्याने नवी मुंबई मधील पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द केल्यास नवी मुंबईतील पेट्रोल-डीजेलचे दर कमी करणेबाबत नवी मुंबईतील पेट्रोल-डीजेल डीलर्सच्या शिष्टमंडळाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. यावेळी  बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी त्वरित सदरबाबत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री श्री. सुधीर मूनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. जलोटा यांजबरोबर चर्चा करून सदर प्रश्न सोडवणुकीच्या उद्देशाने आढावा घेतला व आपल्या शिष्टमंडळासह लवकरच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिले.

          यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, भारत सरकारने GST सारखा कर अस्तित्वात आणल्याने विविध प्रकारचे इतर कर एकाच कराच्या दरात आले. परंतु पेट्रोल-डीजेल वरील इतर कर अजूनही अस्तित्वात आहेत. अशा विविध  कराच्या दरामुळे पेट्रोल-डीजेलचे संपूर्ण महाराष्ट्रातील दरामध्ये व नवी मुंबईमधील दरामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. 20 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मुंबईतील सुमारे 35 पुल, ठाणे बाईपास पुल आणि नवी मुंबई बायपास पुलच्या काही पायाभूत सुविधांसाठी नवी मुंबईकरांवर पेट्रोलवर 1% आणि डिझेलवर 3% अतिरिक्त व्हॅट सेस लावण्यात येत आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्र आणि आसपासच्या भागातील पेट्रोल-डीजेलच्या किंमतीमध्ये फरक पडतो. सद्यस्थितीत नवी मुंबई बाहेरील पेट्रोलचे दर रु.78.61 (25%व्हॅट सेस) व डीझेलचे दर रु.68.07(21%व्हॅट सेस) असताना नवी मुंबईतील पेट्रोलचे दर रु.79.00 (26% व्हॅट सेस) व डीझेलचे दर रु.69.55 (24% व्हॅट सेस) आहेत. देण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांकरिता नवी मुंबईतील नागरिक टोलच्या नावाने अतिरिक्त शुल्क भरत आहे. त्यामुळे पेट्रोल-डीजेलवर नवी मुंबईला इतर दर आणि नवी मुंबई बाहेर वेगळे दर हा नवी मुंबईकरांवर अन्याय आहे. नवी मुंबईमध्ये पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द करून कराचा दर हा इतर जिल्ह्याप्रमाणे केल्यास नवी मुंबईतील पेट्रोल व डीजेलच्या किमती कमी होऊन नवी मुंबईकरांना दिलासा मिळेल.

Previous Post

भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही;जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल!:

Next Post

लोढांनी तुम्हालाही फसवले असेल तर bjplodhacheating@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करा

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

लोढांनी तुम्हालाही फसवले असेल तर bjplodhacheating@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करा

आमदार मंदाताई म्हात्रेंची बुधवारी कंत्राटी कामगारांच्या समस्येवर पालिका आयुक्तांसोबत बैठक

सीबीडी-बेलापूरमध्ये रंगणार “मंगळागौरी महिला महोत्सव” : आ.सौ.मंदा म्हात्रे

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

स्थायी समिती सभेत विविध नागरी सुविधा कामांना मंजूरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com