• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 23, 2019

सोशल मीडियावरील शिवीगाळीविरोधात सचिन सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

adminbyadmin
in मुंबई
0
केंद्र सरकारकडून बेरोजगार युवकांची घोर फसवणूक

मुंबई : सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे यांना समाजमाध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल अत्यंत हीन पातळीची भाषा वापरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्यभरात अशा त-हेच्या अनेक घटना रोज घडत आहेत.मला स्वतःला २०१५ साली चिक्की घोटाळा उघडकीस आणला असताना धमक्या आणि शिवीगाळीचा अनुभव आला होता त्यावेळी याची रितसर तक्रार समतानगर पोलीस ठाणे कांदिवली, मुंबई येथे केली होती. मे महिन्यामध्ये देखील असाच वाईट अनुभव पुन्हा आला त्याचीही तक्रार सदर पोलीस स्थानकात मी दि. ७ मे २०१९ रोजी केलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात असून फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दंभ या धमक्या देणा-यांकडून दाखवला जात आहे. प्रश्न हा आहे की विरोधकांनी केलेली टीका सरकारला आवडत नाही का?लोकशाहीमध्ये विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीची उदात्त परंपरा व पुरोगामी विचारधारा असणा-या महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी घडले नाही. लोकशाहीच्या या प्रथांचे व परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख आणि राज्याच्या गृहविभागाचे मंत्री म्हणून आपली आहे. त्यामुळे उन्मत व सत्तेच्या धुंदीने बेभान झालेल्या या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी असे सावंत म्हणाले.

 

Previous Post

सभापती सुजाता पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा गुणगौरव

Next Post

शिवसेना-भाजपचा भ्रम जनता उतरवून टाकेेल : अशोक चव्हाण

Next Post
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

शिवसेना-भाजपचा भ्रम जनता उतरवून टाकेेल : अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यानेच पाणी बिल थकविले

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यानेच पाणी बिल थकविले

नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६/९७ मध्ये राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा घरोघरी जावून सत्कार

नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६/९७ मध्ये राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा घरोघरी जावून सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com