• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 10, 2019

भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात?

adminbyadmin
in मुंबई
0
अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार

मुंबई – खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे.

लोकसभा निवडणुकीसह राज्यातल्या पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही दानवे यांच्या नेतृत्वात पक्षाला चांगले यश मिळाले. त्यामुळे भाजपला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाजलेल्या नेत्यांची आवश्यकता नाही, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ गोटात आहे. त्यामुळे केवळ पक्ष संघटना मजबूत ठेवू शकेल, अशा ग्रामीण चेहऱ्याची निवड भाजप करू शकते. त्यामुळेच मराठवाड्यातीलसुजितसिंह ठाकूर, पश्चिम महाराष्ट्रातील सुरेश हाळवणकर आणि विदर्भातील संजय कुटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कुटे आणि हाळवणकर हे मंत्री पदाच्या आशेवर होते. मात्र, आता शेवटच्या कार्यकाळात त्यांना मंत्री करणे शक्य नसल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी असा पक्षात मतप्रवाह आहे. तसेच सुजितसिंह ठाकूर आणि हाळवणकर यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. आता अमित शाह काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे.

Previous Post

विधानसभा निवडणुकीत अर्जुनाच्या ‘लक्ष्या’ प्रमाणे काम करा – शरद पवार

Next Post

‘रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या? सचिन सावंत

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

'रिव्हर अँथम'मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या? सचिन सावंत

कारभार सुधारा, अन्यथा जनआंदोलन! आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला सणसणीत इशारा

कारभार सुधारा, अन्यथा जनआंदोलन! आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला सणसणीत इशारा

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com