• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 22, 2019

‘डासभाऊ’ या नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्काराने सन्मानित करावे! सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत
  • ‘डास’बंदकीचे उद्धवपुराण!
  • भाजपबरोबर युती करुन उद्धव ठाकरे मोदींना मोठे भाऊ का म्हणाले? याचे उत्तर मिळाले.

मुंबई : धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे म्हटले आहे. या अगोदर मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता आम्ही अल्पज्ञ वृथा मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते. हे समजल्यावर उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे. ‘डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या या शोधामुळे वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर कासवछाप अगरबत्ती सह विविध उत्पादने वापरुन डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल याकडे जनतेचा प्रयत्न असायचा परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना सारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी. परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधूभावाचे नाते तयार होते, असे उद्धवजींनी आपल्याला सांगतिले असले तरी तोच डास पतीला चावल्यानंतर पत्नीला चावला तर समाजव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नोबेल पुरस्कारातील हा अडथळा दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या साथीने संशोधन करुन या डासांना काही प्रशिक्षण देता येईल का किंवा पती-पत्नी यांना चावल्यानंतर त्यांच्यात बंधूभाव निर्माण होऊ नये याकरता काही लस किंवा काही प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील का याचाही शोध उद्धव ठाकरे व मुंबई महापालिकेनं घेतला पाहिजे.परंतु यातून एकमात्र चांगली गोष्ट साध्य होऊ शकेल, कोणत्याही महिलेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पुरुषाला हे डास पकडून त्या महिलेला चाववावा आणि त्या पुरुषाला चाववावा लागेल त्यांच्यामध्ये बहिण-भावांचे नाते तयार होण्यास मदत होईल. डासबंदकीतून महिलांमध्ये होणाऱ्या अत्याचारामंध्ये प्रचंड घट होऊ शकेल. परंतु धर्म व जातीच्या नावाने राजकरण करुन समाजव्यवस्था बिघडवणाऱ्या व राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या भाजप शिवसेनेला हे कितपत पचनी पडेल यात शंका आहे,असं होऊ नये याकरता काही प्रतिबंधात्मक उपाय उद्धवजींनी योजले असतीलच, भविष्यात तेही उघड होईल असे उपरोधिकपणे सावंत म्हणाले.

गेली पाच वर्षे भाजप आणि मोदींवर प्रचंड आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने तसेच ‘चौकीदार चोर है’, म्हणणारे उद्धव ठाकरे अचानक भाजपबरोबर युती करुन मोदींना मोठे भाऊ का म्हणाले? या जनतेल्या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले आहे. उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस,यांना एकच डास चावला आहे असे दिसते. अमित शाह व भाजप नेते उद्धवजींच्या मनधरणीला मातोश्रीवर मोदींना चावलेला डास घेऊन जात होते असे समजते. प्रचंड का कू करत शेवटी उद्धवजींनी स्वतःच त्या डासाकडून चाववून घेतले असेही विश्वसनीय सुत्राकडून समजते. परंतु मातोश्रीवरचा डास किरीट सोमय्यांना का चावला नाही? याविवंचनेत सोमय्या असतील. त्यामुळे सोमय्यांनीही एखादा डास पकडून उद्धव ठाकरेंची वेळ मागायला काही हरकत नाही, असेही सावंत म्हणाले.

Previous Post

‘मी मतदान करणारच’ फोटो पॉईंट व स्वाक्षरी फलकाचा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळाली कॉंग्रेसच्या उद्रेकाची भेट, सागर नाईक टाटा कोणाला करून जातायऽऽऽ

Next Post
राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळाली कॉंग्रेसच्या उद्रेकाची भेट,  सागर नाईक टाटा कोणाला करून जातायऽऽऽ

राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळाली कॉंग्रेसच्या उद्रेकाची भेट, सागर नाईक टाटा कोणाला करून जातायऽऽऽ

राजन विचारेंच्या प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा जोरदार प्रचार

राजन विचारेंच्या प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा जोरदार प्रचार

प्रकल्पग्रस्तांच्या घरांना झोपड्या म्हणणार्‍या खासदार विचारेविरोधात नवी मुंबईत संताप

प्रकल्पग्रस्तांच्या घरांना झोपड्या म्हणणार्‍या खासदार विचारेविरोधात नवी मुंबईत संताप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com