• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2018

भाजपाचा खिलजी ह’राम’ कदमला उखडून फेका – उद्धव ठाकरे

adminbyadmin
in मुंबई
0
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

मुंबई – मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपाचेराम कदम यांच्यावर चौफेर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर सामना संपादकीयमधून सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राम कदमांचा उल्लेख हराम कदम असा करत बोचऱ्या शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. ”जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राम कदमांवर सडकून टीका केली आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे – 
–  आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय? 

– भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे? 

– आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे. 

– सगळय़ांवर आमदार कदम यांनी हरामखोरीचा कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही. 

 – भाजप आमदाराच्या विकृतीने शिवरायांचाच अपमान झाला. 

– या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय? 

– एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रीयांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. 

– मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री पंकजा मुंडे यांनी तरी यावर बोलावे. स्त्रीयांच्या हक्कांसाठी टी.व्ही.च्या पडद्यावर ताडताड बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तरी कोठे आहेत? 

– राम कदमांनी जे केले ते काँग्रेसच्या आमदाराने केले असते तर एव्हाना या मंडळींनी काय गोंधळ घातला असता. राहुल गांधींना फासावर लटकवायलाच ते निघाले असते. 

– या ‘हराम’ कदम यांनी आता ट्विटरवरून माफीनामा जाहीर केला आहे. अर्थात तोदेखील तीन दिवसांनी. माफी मागायला या महाशयांनी इतका वेळ घेतला यावरूनदेखील ही विकृती किती भयंकर आहे याची कल्पना येते. 

– लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळय़ात मोठा दणका द्यावा.

Previous Post

जामिनाचा अर्ज फेटाळल्याने नामदेव भगत फरार

Next Post

राम कदमांवर तोंडसुख घेणारे उध्दव ठाकरे नवी मुंबईतील भगत प्रकरणावर मुग गिळून का बसले आहेत?

Next Post

राम कदमांवर तोंडसुख घेणारे उध्दव ठाकरे नवी मुंबईतील भगत प्रकरणावर मुग गिळून का बसले आहेत?

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

स्वातंत्र्यदिन गेला, रक्षाबंधन गेले, गणपती जवळ आले, पगार भेटणार तरी कधी?

काँग्रेसने २०२४ ची तयारी करावी – चंद्रकांत पाटील

24 तासांतच चंद्रकांत पाटलांनी शब्द बदलला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com