• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने 285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आ. मंदा म्हात्रे यांच्या  प्रयत्नाने  285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

 नवी मुंबई:- वाशी नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय करण्याकरिता 285 गाळ्यांचा 9 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून सदर 285 गाळ्यांचा बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.  यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व अध्यक्ष श्री. सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, शंकरशेठ पिंगळे, रमेश किस्ते, अभियंता पांडुरंग पिंगळे, कैलास ताजणे, रामदास चासकर, अँड. राहुल पवार तसेच शेकडो व्यापारी उपस्थित होते.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील  अतिरिक्त भाजीपाला आवारात सन 2009 पासून भाजीपाला व्यापारहोत नसल्याने तेथील बंद गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिली गेली होती. एपीएमसीतील अतिरिक्त भाजीपाला आवारामधील गाळेधारकांना कृषीपूरक शेतमाल विक्रीकरिता परवानगी देण्यासाठी त्यांनी पणन विभाग व शासन दरबारी पाठपुरावा केला होता. अतिरिक्त भाजीपाला आवारातील 285 गाळ्यांमध्ये भाजीपाला व्यवसाय होत नसल्याने गेल्या 9 वर्षापासून हे गाळे बंद होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत होती. या गाळेधारकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली असता  त्यानुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी कृषी पूरक व्यवसाय करण्यास परवनागी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येऊन सदर गाळ्यांच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. ए.पी.एम.सी. चे प्रशासक व अध्यक्ष श्री. सतीश सोनी यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत सांगितले कि, ताईंच्या कष्टाने या 285 व्यापाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला असून आज ताईंच्या हस्ते जसे बांधकामाचे भूमिपूजन झाले आहे, तसेच येत्या 4 महिन्यात सदर गाळे तयार करून या संपूर्ण 285 गाळ्यांचे उदघाटनही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याच हस्ते करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.   

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, गेल्या 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न घेऊन येथील व्यापाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिले असता मी राज्याचे तत्कालीन पणन मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांजकडे सदरबाबत सतत पाठपुरावा करून त्याकरिता 3 बैठका घेऊन हा प्रश्न पूर्णत्वास नेला. त्याकरिता त्वरित निर्णय घेणाऱ्या मा. मंत्री महोदय श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचेही आभार मानावे तेवढे कमी आहेत.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय आता करण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. आज व्यापारांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे सांगत सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.

Previous Post

अपघाती मृत्यूच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

Next Post

लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

Next Post
लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

शिरवणे येथे दैनंदिन बाजार इमारतीचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन

शिरवणे येथे दैनंदिन बाजार इमारतीचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी जाणता राजा तरुण मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यदिनी जाणता राजा तरुण मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com