• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2018

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही

adminbyadmin
in मुंबई
0
ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही

 मुंबई : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्राफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

Previous Post

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

Next Post

राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

Next Post
राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे

लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे

शाळेमध्ये विषबाधेमुळे मुंबईत  विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेमध्ये विषबाधेमुळे मुंबईत विद्यार्थिनीचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com