• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2018

9 महिने ते 15 वर्षाआतील 50 हजार मुलांना टायफॉईड लसीकरण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
9 महिने ते 15 वर्षाआतील 50 हजार मुलांना टायफॉईड लसीकरण

श्रीकांत पिंगळे 

      नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने 14 जुलै ते 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात टायफॉईड कंज्युगेट लसीकरण अभियान राबविण्यात येत असून याबाबतचे वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 11 नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात हे अभियान राबविण्यात येत असून 21, 22 व 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 28 हजार 274 मुलांना लसीकरण करण्यात आले.

      महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज सिटी हॉस्पिटल, कोपरखैरणे येथे लसीकरण बुथला भेट देऊन बुथ मांडणी, साहित्य मांडणी, सिरिंजेसचा साठा, लसीची शीतसाखळी या सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांचीही मते जाणून घेत मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, श्री.रविंद्र पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी (आर.सी.एच.) डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. अभियानाच्या प्रारंभी 14 जुलै रोजी महापौर श्री. जयवंत सुतार यांनीही शिरवणे नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण बुथला भेट देऊन पाहणी केली होती.

      दि.14 व 15 जुलै या दोन दिवसात नऊ महिने ते 15 वर्षाआतील 20 हजार 838 मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता. आता 21, 22 व 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तीन दिवसात 28 हजार 274 मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून अशाप्रकारे एकूण 49 हजार 112 लाभार्थींनी नेरुळ से.48, नेरुळ फेज 1, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा अशा 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात लसीकरणाचा लाभ घेतला आहे.  

      या टायफॉईट कंज्युगेट (Typbar – TCV) लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्व पात्रता आहे व जागतिक आरोग्य संघटनेने या लसीची शिफारस केली आहे. नवी मुंबईतील खाजगी बालरोगतज्ज्ञ या लसीचा वापर मागील 5 ते 6 वर्षांपासून करीत असून बाजारात या लसीची किंमत महाग आहे.

      आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध हाच उपचार हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 9 महिने ते 15 वर्षाआतील मुलांना ही लस मोफत दिली जात असून यापुढील लसीकरण 28 व  जुलै रोजी होणार आहे हे लक्षात घेऊन  पहिल्या टप्प्यातील 11 नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आपल्या मुलांना टायफॉईटपासून संरक्षित करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Previous Post

ठामपाच्या स्मशानभुमीत गंध रातराणीच्या फुलांचा

Next Post

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

Next Post
झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com