• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2018

नवी मुंबई संक्रमण शिबिर उभारण्याची आ. मंदा म्हात्रेंची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई संक्रमण शिबिर उभारण्याची आ. मंदा म्हात्रेंची मागणी

नवी मुंबई :- नवी मुंबईत सुमारे 378 इमारतींना महापालिकेकडून धोकादायक  म्हणून जाहीर केले असताना प्रशासनाने आपली जबाबदारी झटकत या रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरासारखी महत्वाची गरज अपूर्ण ठेवली आहे. सदर धोकादायक इमारतींमधून हजारो नागरिक राहत असून नवी मुंबईत एकही संक्रमण शिबीर नसल्याने  बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात नवी मुंबईत संक्रमण शिबिराकरीता औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि,  सिडकोने 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती निकृष्ट दर्जाच्या ठरू लागल्या असून त्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गेली 20 वर्षे प्रलंबित आहे.  नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असताना प्रशासनाने बांधलेल्या संक्रमण शिबिराचा प्रस्ताव सत्ताधारी पक्ष विनाकारण स्थगित ठेवत आहेत. नवी मुंबईत यंदा 378 इमारती धोकादायक व 58 इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या असून पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याची परवानगी देणारा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधारी विनाकारण विरोध करीत नागरिकांना वेठीस धरत आहेत. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना राहत्या घराजवळच पर्यायी व्यवस्था हवी असल्याने नोकरी, मुलांची शाळा-महाविद्यालयांसाठी हे रहिवाशी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास तयार होत नाहीत. नवी मुंबईत एकही संक्रमण शिबीर नसल्याने संक्रमण शिबिरांची गरज भासत आहे. ती व्यवस्था न झाल्यास इमारत दुर्घटनेत अपघातग्रस्त रहिवासी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत संक्रमण शिबीर उभारावे तसेच जर एखादी दुर्घटना झाल्यास ज्या सत्ताधाऱ्यांनी सदर संक्रमण शिबिरांना विरोध केला आहे,अशांवर कारवाईची मागणी केली असल्याचेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Previous Post

‘मल:निस्सारणची झाकणे दाखवा अन्यथा पोलिसांमध्ये झाकणे चोरीचा गुन्हा दाखल करणार’

Next Post

स्पे. सरपंच थाळी नवी मुंबईत दाखल होणार

Next Post
स्पे. सरपंच थाळी नवी मुंबईत दाखल होणार

स्पे. सरपंच थाळी नवी मुंबईत दाखल होणार

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

वाशी आणि ऐरोली पूल टोल फ्री करावेत : आमदार संदीप नाईक

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

‘सामाजिक सेवेसाठी राखीव भुखंड फ्री होल्ड करावेत’ : आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com