• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2018

जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला – संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0

अमोल इंगळे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने स्वत:च बांधलेले अनधिकृत मार्केट तोडण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली. सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचे जवळपास २५ लाख रूपये महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि राजकारण्यांच्या महत्वाकांक्षेमुळे पाण्यात गेले आहे. जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची लेखी मागणी नेरूळ सेक्टर सहामधील सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमधील दत्तगुरू व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी मैदानात सिडकोने मार्केट व सर्व्हिस स्टेशनसाठी आरक्षित असलेल्या भुखंडापैकी मार्केटच्या जागेवर महापालिका प्रशासनाने जवळपास २५ लाख रूपये खर्च करून मार्केट बांधले होते. तथापि आरक्षित भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट उभारले गेल्याने ते अनधिकृत ठरले. ते मार्केट शुक्रवार ८ जुन रोजी महापालिका प्रशासनाने पाडले. आज या घटनेला १८ दिवस उलटले तरी मार्केटचे डेब्रिज व लोखंडी सळ्या, पत्रे उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लोखंडी सळ्या या वरूण सोसायटीलगतच्या पदपथासमीप असल्याने मुले पळताना अथवा रात्रीच्या अंधारात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. पण आता ते डेब्रिज व अन्य कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाला कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय? असा प्रश्‍न संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. या डेब्रिजमुळे पाणी साचून साथीच्या आजाराची स्थानिक रहीवाशांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला. अन्यथा यातून साथीच्या आजाराला खतपाणी मिळून आजाराचा उद्रेक झाल्यास अथवा बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यामुळे दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन आणि मार्केट पाडण्यासाठी आग्रही असणारे राजकारणीच जबाबदार असतील, याची महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी. मार्केट पाडण्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणणार्‍या राजकारण्यांना इतके दिवस झाले तरी डेब्रिज दिसत नाही, हे स्थानिक रहीवाशांचे दुर्देवंच म्हणावे लागेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण शक्य तितक्या लवकर डेब्रिज उचलण्याचे, लोखंडी सळ्या हटविण्याचे आणि मैदानात पडलेले लोखंडी पत्रे उचलण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वीही या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज उचलण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी २१ जून रोजी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

Previous Post

31 मे पूर्वीच पाठविला राज्य शासनाला पाणी कृती आराखडाः गणेश देशमुख

Next Post

ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

Next Post
ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना मंगळवारी निदर्शने करणार

मुंबईत शिवसेनेचाच 'आवाssज

नेरूळ उरण फाटा येथील आदिवासी पाड्याचा होणार पुनर्विकास

नेरूळ उरण फाटा येथील आदिवासी पाड्याचा होणार पुनर्विकास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com