• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2018

काँग्रेसचे आज विभागीय शिबीर व जाहीर सभा

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गटबाजीच्या विळख्यात मुंबई कॉंग्रेस

नांदेड :- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या  पूर्व तयारीस काँग्रेस पक्ष लागला असून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह भरण्यासाठी १९ एप्रिल  रोजी नांदेड येथे  काँग्रेस पक्षाचे मराठवाडा पातळीवरील  विभागीय शिबीर आणि जाहीर सभा होणार आहे.

येथील भक्ती लॉन्समध्ये काँग्रेस पक्षाचे विभागीय शिबीर दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तर दुसरे सत्र दुपारी २.३० वाजता सुरु होवून सायंकाळी ५.३० वाजता शिबिराची सांगता होणार आहे. हे शिबीर केवळ निमंत्रितांसाठीच असून मराठवाडयातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, मजूर फेडरेशन, बाजार समित्या यामधील काँग्रेस पक्षाचे विद्यमान सदस्य तसेच पक्ष संघटनेतील ब्लॉक ते राष्ट्रीय पातळीवरील मराठवाडयातील काँग्रेस पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

विभागीय शिबिरानंतर सायंकाळी ६.०० वाजता नवा मोंढा मैदानावर काँग्रेस पक्षाची भव्य जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री  व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत. भक्ती लॉन्स येथे होणार्‍या शिबिरास महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.  राजीव सातव, खा. कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. यशोमती ठाकूर, आ.बस्वराज पाटील,आ.अब्दुल सत्तार, आ. मधुकर चव्हाण, आ. दिलीपराव देशमुख, आ. हर्षवर्धन  सपकाळ, आ. डी.पी.सावंत, आ. सौ. अमिताताई चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह मराठवाडयातील सर्व काँग्रेस आमदारांची उपस्थिती लाभणार आहे.

नवामोंढा येथे होणार्‍या जाहीर सभेस उपरोक्त सर्व मान्यवरांसह सुप्रसिध्द शायर इम्रान प्रतापगढी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी भक्ती लॉन्स येथे होणार्‍या  शिबिरास निमंत्रितानी तर नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेस सर्व काँग्रेस कार्यकर्ते व  नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.

Happy Birthdaqy

Previous Post

आमदार निधीतून उभारलेल्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे उदघाटन आमदार मंदा म्हात्रेच्या हस्ते संपन्न

Next Post

निर्भयावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कामोठेकरांचा कॅडल मार्च

Next Post
निर्भयावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कामोठेकरांचा कॅडल मार्च

निर्भयावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कामोठेकरांचा कॅडल मार्च

चाकूच्या धाकावर शिक्षिकेचे मंगळसूत्र लुटणा-या दोघांना अटक

३१५०० वर सोन्याचा भाव जावूनही अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा उत्साह कायम

स्मशानभूमी नसल्याने रबाले झोपडपट्टीधारकांची मरणानंतरही ससेहोलपट कायम

स्मशानभूमी नसल्याने रबाले झोपडपट्टीधारकांची मरणानंतरही ससेहोलपट कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com