• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 24, 2018

राज्याचे नगरविकास खाते बिल्डरांसाठीच चालवले जात आहे का? : सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

 निवडणुकीचा निधी जमा करण्याकरिताच विकास आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात आहेत

बिल्डरांच्या फायद्यासाठी विकास आराखड्याच्या मूळ उद्देशालाचा हरताळ फासला

 मुंबई :-  ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच लावलेला आहे. सदर प्रस्तावित बदल बिल्डरांचे उखळ पांढरे करून निवडणुकीचा निधी जमा करण्याकरिताच केले जात आहेत असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, नोव्हेंबर २०१७ पासून राज्य सरकारने विकास नियंत्रक नियमावलीत बदल करणा-या अधिसूचनांचे मसुदे काढलेले आहेत. सिताराम कुंटे यांच्या नेतृत्वाखालील समितीने प्रस्तावीत केलेला विकास आराखडा रद्द करताना जी कारणे दाखवली होती त्यात मुंबईकरिता अनियंत्रीत FSI हे एक कारण होते. त्यानंतर नविन विकास आराखड्यामध्ये मुळ उद्देशानुसार 2 FSI गृहीत धरून विकास आराखड्याची आखणी करण्यात आली.  असे असतानाही १९९१ च्या विकास नियंत्रक नियमावलीत बदल प्रस्तावित करून नगरविकास खात्याने सदरचा FSI हा मागच्या दाराने वाढवण्याचा घाट घातला आहे.  या संपूर्ण प्रक्रियेत लोकप्रतिनिधी व मुंबईच्या जनमानसाशी संवाद न साधता सर्वसहमतीची प्रक्रियाच बाद केली आहे. FSI च्या संदर्भातील एवढा मोठा बदल प्रस्तावीत करून विकास आराखड्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम सरकारने केले आहे.  

FSI च्या संदर्भातील धरसोड वृत्ती ही केवळ काही बिल्डरांचे हित लक्षात घेऊन अवलंबविली जात आहे. FSI वरील मर्यादा काढल्या जात आहेत, परत घातल्या जात आहेत याबाबतच्या धोरणात कोणतीही सुसुत्रता आणि सुस्पष्टता दिसून येत नाही. त्यामुळे आर्थिक निकषातून आलेला हा वैचारिक गोंधळ मुंबईकरांच्या जीवनावर अनिष्ठ परिणाम करणारा आहे असे सावंत म्हणाले. 

Previous Post

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड

Next Post

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Next Post
नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वाटप

वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वाटप

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com