• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2018

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

काँग्रेस मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 दिपक देशमुख / मुंबई 

 संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आपला लढा अधिक तीव्र करणार असून विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सामाजिक वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करित आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. पण काँग्रेस पक्ष अशा प्रकारांना घाबरणार नाही. संविधान वाचले तरच हा देश वाचेल, त्यामुळे संविधान बदलण्याचे कारस्थान करणा-या या सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई, आ. शरद रणपिसे,  आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसूचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, यशवंत हाप्पे, राजन भोसले युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आजपासून सुरु झालेल्या पनवेल ते वडाला लोकलचे बेलापूर रेल्वे स्थानकात शिवसेनेकडून स्वागत

Next Post

नवी मुंबईतील एलआयजीतील अतिक्रमणेही लवकरच येणार महापालिकेच्या रडारवर?

Next Post
नवी मुंबईतील एलआयजीतील अतिक्रमणेही लवकरच येणार महापालिकेच्या रडारवर?

नवी मुंबईतील एलआयजीतील अतिक्रमणेही लवकरच येणार महापालिकेच्या रडारवर?

नवी मुंबईतील एमएसईडीसीची सबस्टेशन आता महापालिकेच्या रडारवर

नवी मुंबईतील एमएसईडीसीची सबस्टेशन आता महापालिकेच्या रडारवर

मोकाट कुत्र्यांचा पाच मुलांसह गायीला चावा

मोकाट कुत्र्यांचा पाच मुलांसह गायीला चावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com