• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2017

बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुंबई : वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या विषयी प्रतिक्रिया व्यक्त सावंत म्हणाले की, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावत आहेत़ असा व्हिडीओ विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसिध्द झाला असून महाजन यांनीही त्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करण्याची महाजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही महाजन दिव्यांग मुलांच्या कार्यक्रमात आपल्या कमरेला बंदूक लावून गेले होते. एका आमदारालाही त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना समोर आली होती. बंदूक चालवण्याचा अतिआत्मविश्वास कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळिकीतून आला असावा असा टोला सावंत यांनी लगावला

जलसंपदा खात्यातील ठेकेदारांनी आपल्याला शंभर कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होते असे याच महाजनांनी सांगितले होते पण या संदर्भात लाचलुचपत खात्याकडे याची तक्रार केली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दारूला महिलांची नावे द्यावे असे वक्तव्य केले होते. ट्रक चालवण्यासारखे स्टंट ही करून झाले आहेत.  हातात बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे फिरणे हे जलसंपदा मंत्र्यांचे काम तर नाहीच पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे असे म्हणत बेजबाबदार पणे शस्त्राचा वापर केल्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. गिरीष महाजन मंत्री म्हणून कामात झिरो असल्याने अशी स्टंटबाजी करून ते हिरो होण्याचा प्रयत्न करित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या बंदूकबाज मंत्र्यांला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून स्टंटबाजी करण्यासाठी भविष्यात हॉलीवूडला पाठवावे असा टोला सावंत यांनी लगावला.  

 

 

Previous Post

ठाणे-तुर्भे मार्गावरील प्रवास १५ ते २० मिनिटांवर येणार

Next Post

आवक घटल्याने मार्केटमध्ये संत्री महागली

Next Post
आवक घटल्याने मार्केटमध्ये संत्री महागली

आवक घटल्याने मार्केटमध्ये संत्री महागली

पोष्टाच्या कार्यालयात लिफाफे नसल्याने ज्येष्ठांनी परवड

पोष्टाच्या कार्यालयात लिफाफे नसल्याने ज्येष्ठांनी परवड

पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे

पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com