• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2017

भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

 श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
मुंबई :-  
कोकणातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार रमेश कदम तसेच सिंधुदुर्ग शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा खेडेकर, खेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटणे यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतील टिळकभवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खा.हुसेन दलवाई,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयवंतराव आवळे, आ.भाई जगताप, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रत्नागिरीचे प्रभारी विश्वनाथ पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत, नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

    याप्रंसगी बोलताना रमेश कदम म्हणाले वयाच्या १८ व्या पासून मी काँग्रेस पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती. राजकारणात विविध पक्षात काम केल्यानंतर तेथील कार्यपध्दती पाहिल्यानंतर आपल्या घरचा काँग्रेस पक्षच अधिक चांगला हे लक्षात आले. त्यानुसार आज मी माझ्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.  यापुढे रत्नागिरी व कोकणात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आम्ही जुना-नवा वाद निर्माण न करता एकदिलाने काम करु. येत्या महिनाभरात रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा घेण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

     यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी आ.रमेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे कोकणात पक्षाची ताकद वाढेल. मध्यंतरीचा काही काळ वगळता कोकण हा नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापुढे आपण प्रामाणिक व एकजुटीने काम केल्यास निश्चितच कोकणात काँग्रेसला चांगले यश मिळू शकते असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.

Previous Post

क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील गुणवंत खेळाडूंचा आयुक्तांनी केला सन्मान

Next Post

दोन अधिकार्‍यांना निलंबित करून पालिका आयुक्तांचा भूमाफियांना इशारा

Next Post
कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

दोन अधिकार्‍यांना निलंबित करून पालिका आयुक्तांचा भूमाफियांना इशारा

गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकणारी वाढीची भाजी आलीय मार्केटमध्ये विक्रीला

वाढीची भाजी आता ओळखणे झाले अवघड

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांसाठी “प्रतिमा – नवी मुंबईची, छायाचित्रण स्पर्धा”

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांसाठी "प्रतिमा - नवी मुंबईची, छायाचित्रण स्पर्धा"

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com