• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2017

विमानतळ परिसरातील ‘नैना’ गावांसाठीचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत !

adminbyadmin
in पनवेल
0
विमानतळ परिसरातील ‘नैना’ गावांसाठीचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत !

पनवेल : नवीन विमानतळ परिसरातील (नैना) गावांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना तसेच तात्पुरती उपाय योजनेचा आराखडा तयार करावा व या माध्यमातून या गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल दिले. नैना परिसरातील गावांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, या परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ना. लोणीकर पुढे म्हणाले, या परिसरातील वाढते शहरीकरण व त्या अनुषंगाने वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता सिडकोने दीर्घकालीन नियोजन करावे. या परिसरातील गावांना तातडीने पाणी पुरवठा करता यावा यासाठी तात्पुरता उपाय म्हणून सिडकोने व नवी मुंबई महानगरपालिकेने काही एमएलडी पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे व त्या मार्फत या गावांना पाणी पुरवठा करावा.

           या परिसरातील गावांना लागणारे पाणी व शहरी करणामुळे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली.

Previous Post

मूषक नियत्रंकांनी आत्महत्या केल्यावर महापालिका प्रशासनाला जाग येणार काय?

Next Post

सुविधा नसल्याने एसटी कर्मचार्‍यांनी केले ‘कामबंद आंदोलन’

Next Post
सुविधा नसल्याने एसटी कर्मचार्‍यांनी केले ‘कामबंद आंदोलन’

सुविधा नसल्याने एसटी कर्मचार्‍यांनी केले ‘कामबंद आंदोलन’

वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या – ऊर्जामंत्री बावनकुळे

वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या - ऊर्जामंत्री बावनकुळे

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com