• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2017

२७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा – आमदार नरेंद्र पवार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोहन रेजन्सीच्या रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही
 स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
*** कल्याण – डोंबिवली शहरात सामूहिक विकास योजना लागू करा
*** आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत नियम २९३ अन्वये चर्चा करताना मागणी 
कल्याण : विरोधी पक्ष आणि विधानसभा सदस्य यांच्या माद्यमातुन शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या नियम २९३ अन्वये चर्चेत आमदार नरेंद्र पवार यांनी सहभाग घेऊन कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत यागावांची वेगळी नगरपालिका होत नाही तो पर्यंत त्या परिसराच्या विकासासाठी ५०० कोटीचा विशेष विकास निधीची त्यांनी  मागणी केली. तसेच ऐतिहासिक महत्व असलेल्या कल्याण डोंबिवली शहराचा सामूहिक विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत) सहभाग करावा अशी महत्वाची  मागणी केली. त्याचप्रमाणे शहरातील आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि रखडलेले बीओटी प्रकल्प आदी विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.
 
 महापालिका क्षेत्रात जकात रदद् होऊन त्या स्थानिक कर प्रणालीची जागा एलबीटीने घेतली. मात्र या कर प्रणालीला विरोध झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाना ठोक अनुदान देऊन आघाडी सरकारने एलबीटी कर प्रणाली रदद् केली. यानंतर आता नुकतीच देशभर जीएसटी कर प्रणाली लागू झाली. या कर प्रणालीतील वेळोवेळी बदल झाल्याने महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाची आर्थिक स्थिती नाजुक झाली आहे. याचा परिणाम थेट विकासावर झाल्यामुळे विरोधी पक्षाच्या माद्यमातुन विधानसभेत मांडण्यात आलेल्या नियम २९३ अन्वये चर्चेत आमदार नरेंद्र पवार यांनी सहभाग घेऊन कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत यागावांची वेगळी नगरपालिका होत नाही तो पर्यंत त्या परिसराच्या विकासासाठी ५०० कोटीचा विशेष विकास निधीची त्यांनी  मागणी केली. तसेच ऐतिहासिक महत्व असलेल्या कल्याण डोंबिवली शहराचा सामूहिक विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत) सहभाग करावा अशी मागणी केली. 
त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची अवस्था बिकट असून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे या रुग्णालयाला इचलकरंजी आणि मिराभाईंदर आदी रुग्णालया प्रमाणे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक पर्याय असलेल्या गोविंदवाडी बायपास वरील एक पुल कमकुवत असल्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यामुळे संबंधित पुलाबाबत योग्य निर्णय घेऊन अवजड वाहने गोविंदवाडी बायपासवरुन सुरु करण्याबाबत निर्देश देण्याची विनंती आपल्या भाषणातून सरकारला केली. तसेच महापालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीओटी प्रकल्पांबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९३ अन्वये झालेल्या चर्चेबाबत सरकारच्यावतीने निवेदन करणार आहेत.
Previous Post

भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे मीरा भाईंदरमधील तरूण मतदारांना आकर्षण

Next Post

नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

Next Post
नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कराभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावाः सचिन सावंत

नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com