• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2017

मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कराभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावाः सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775

* शिक्षण क्षेत्राच्या बट्ट्याबोळाला रा. स्व. संघ आणि शासन जबाबदार

** कुलगुरु संजय देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा  

*** विनोद तावडे व रविंद्र वायकर यांनी मंत्रीपदावरून तात्काळ पायउतार व्हावे.  

 मुंबई : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कार्यक्षमता, अनुभव आणि पात्रता या महत्त्वाच्या गुणांऐवजी संघाशी संबंधित असणा-या, संघ विचारधारा मानणा-या लोकांना प्राधान्य दिल्यानेच आज शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. मुंबई   विद्यापीठातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून या विद्यापीठातील अनागोंदी कराभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरले आहे. सरकारच्या मदतीने आपल्या विचारधारेचा प्रसार करण्याकरिता व संघ विचारधारेशी संबंधित लोकांची नियुक्ती वेगवेगळ्या पदांवरती करून त्यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्रात संघाची घुसखोरी सुरु आहे. अनेक कार्यक्षम आणि लायक लोकांना डावलून त्यांचा बळी दिला जात आहे. मुंबई विद्यापीठातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती करित असताना विद्यमान कुलगुरुंपेक्षा अधिक अनुभवी व  कार्यक्षम  उमेदवारांनी अर्ज केले असतानाही केवळ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आणि संघाशी संबंध हीच गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यमान कुलगुरुंची नियुक्ती करण्यात आली होती हे स्पष्ट आहे. ही नियुक्ती होत असताना अनेक सुयोग्य उमेदवारांना डावलून त्यांचा बळी देण्यात आला. या प्रक्रियेत डावलेल्या सर्व उमेदवारांची यादी सरकारने जाहीर करावी जेणेकरून किती सुयोग्य उमेदवारांचा बळी देण्यात आला हे जनतेला समजेल असे सावंत म्हणाले.

विद्यमान कुलगुरुंनी देखील गुरुदक्षिणा म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला मुंबई विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था म्हणून मान्यता दिली. भविष्यात पीएचडी आणि एम. ए (राज्यशास्त्र) सारख्या पदव्या देखील ही प्रबोधिनी देऊ शकणार आहे. या संस्थेच्या बरोबर मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे ‘एक्स्प्रेस वे टू प्रोग्रेस’ हा देशातील पायभूत सुविधांच्या संदर्भात संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात प्रबोधिनी बद्दलची त्यांची कृतज्ञता ओसंडून वाहत होती. कुलगुरुंच्या संघाशी असणा-या जवळिकीमुळेच शासनाने मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  आज लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्याचे काम कुलगुरुंनी केले आहे. काँग्रेस पक्ष या संपूर्ण प्रकाराचा निषेध करित असून राज्यपालांनी तात्काळ कुलगुरु संजय देशमुख यांची हकालपट्टी करून सुयोग्य व्यक्तीची कुलगुरूपदी नियुक्त करावी तसेच या संपूर्ण अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण मंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री या दोघांनीही या अकार्यक्षमतेची जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे असे सावंत म्हणाले.   

Previous Post

नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

Next Post

नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post
नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या रोजगाराभिमुख आधुनिक व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी

मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी – नगरसेवक गिरीश म्हात्रे

मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी - नगरसेवक गिरीश म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com