• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 8, 2017

मनसेचा घेराव…MGM शाळा नरमली…RTE विद्यार्थ्यांना प्रवेश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मनसेचा घेराव…MGM शाळा नरमली…RTE विद्यार्थ्यांना प्रवेश

*शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला मात्र केराची टोपली*
*MGM शाळेने RTE प्रवेशाला दिला होता नकार*

योगेश शेटे
नवी मुंबई :  RTE २५% टक्के प्रवेश यादीत नावे येऊन देखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या नेरूळ येथील MGM शाळेला आज मनसे स्टाईल आंदोलनाला सामोरे जावे लागले. आज दि.०८ एप्रिल रोजी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते नेरूळ MGM शाळेत पालकांसोबत धडकले. यावेळी RTE २५% टक्के प्रवेशाचे केंद्र समन्वयक आत्माराम मिरकुटे देखील उपस्थित होते. याप्रसंगी मनसेने आक्रमक भूमिका घेत MGM शाळेचे प्रमुख व्यवस्थापक जे.डी.पाटील, CBSE च्या मुख्याध्यापिका सविता दास व मुख्याध्यापक रमेश कोटकर यांना घेराव घातला व RTE २५% टक्के अंतर्गत प्रवेश द्या अन्यथा कॅबीन मध्येच कोंडून ठेऊ असा इशारा दिला. मनसेची आक्रमकता पाहून अखेर MGM शाळा प्रशासन नरमले व त्या विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेश देण्याचे मान्य केले व तात्काळ MGM शाळेने त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.

दि. २४ मार्च २०१७ पासून RTE अंतर्गत दुसऱ्या प्रवेश यादीत नाव येऊन ही नेरूळ येथील MGM शाळेने विद्यार्थ्यांना Jr.KG. ला प्रवेश देण्यास पालकांना स्पष्ट नकार दिला होता. याचसंदर्भात तक्रारी आल्यांनतर दि.०४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी MGM शाळा प्रशासनाला मान्यता रद्द करू अशी नोटीस दिली होती. मात्र मुजोर MGM शाळा प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. आज दि.०८ एप्रिल ही प्रवेशाची अंतिम तारखेची मुदत असून देखील या विद्यार्थ्यांना MGM शाळेने प्रवेश दिला नव्हता. अखेर आज दि.०८ एप्रिल रोजी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली, पालकांच्या उपस्थितीत, मनसेने MGM शाळेच्या प्रशासनाला घेराव घातला व त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली. तसे न केल्यास कॅबीन मध्येच कोंडून ठेऊ असा इशारा यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला. यावेळी उपस्थित केंद्र समन्वयक आत्माराम मिरकुटे व शाळा प्रशासन अखेर मनसेच्या या रौद्र रुपा समोर झुकले व या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यावेळी उपस्थित पालकांनी या दोन तासांमध्ये आपल्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया देखील पूर्ण केली.

याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शाळेने RTE अंतर्गत प्रवेश देण्यास अडचण निर्माण केल्यास त्वरित मनसेला या 9664278717, 9664848007 या क्रमांकांवर संपर्क करावा. नवी मुंबईत RTE प्रवेशास शाळा नकार देण्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर DPS शाळेने ५० विद्यार्थ्यांना RTE २५% टक्के अंतर्गत प्रवेश नाकारला होता. त्यावेळी देखील मनसेच्या दणक्यामुळे DPS शाळा नरमली होती व त्यांनी प्रवेश दिला होता. यातून शिक्षणधिकाऱ्यांनी धडा घ्यावा व आपला वचक कायम ठेवावा असे देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, रोजगार विभागाचे अप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष सचिन कदम, अभिजित देसाई, उपविभाग अध्यक्ष शिवम कवडे, शाखा अध्यक्ष विराट शृंगारे, सागर नाईकरे, सागर घोडेकर, विनायक पिंगळे, मंदार घरत व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

Previous Post

नगरसेविकेने स्वखर्चाने बसविले प्रभागामध्ये सोसायटीअंर्तगत सीसीटीव्ही कॅमेरे

Next Post

लाइव्ह बातमी देतानाच तिला समजले पतीचे झाले निधन, तरी आवरला भावनावेग

Next Post
लाइव्ह बातमी देतानाच तिला समजले पतीचे झाले निधन, तरी आवरला भावनावेग

लाइव्ह बातमी देतानाच तिला समजले पतीचे झाले निधन, तरी आवरला भावनावेग

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात वाशीमध्ये आ. मंदा म्हात्रेंना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात वाशीमध्ये आ. मंदा म्हात्रेंना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाण्यात तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

ठाण्यात तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com