• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 25, 2017

नवी मुंबई महानगरपालिकेची अभिनव संकल्पना खेळाडू दत्तक घेऊन निर्माण करणार कबड्डी, खो-खो, शुटिंगबॉल खेळाचे व्यावसायिक संघ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन
साईनाथ भोईर 
नवी मुंबई-: नवी मुंबई शहरातील उदयोन्मुख व प्रतिभावंत क्रीडापटूंच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देत प्रोत्साहित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्‍या क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने क्रीडापटूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य देखील मिळावे या उद्देशाने खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले होते. या खेळाडू दत्तक घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी होण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे होतकरु व उदयोन्मुख खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेले आहे.

त्यानुसार कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे संघ तयार करण्यात येणार असून प्रथम प्राधान्य नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खेळाडूंना असणार आहे. कबड्डी संघाकरीता 15 खेळाडू, खो-खो संघाकरीता 15 खेळाडू व शुटिंगबॉल संघाकरीता 10 खेळाडूंची करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणार आहे.

सदर संघांमध्ये विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संघाचे प्रतिनिधीत्व केलेले कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळनिहाय अनुक्रमे 10, 10 व 06 खेळाडू आणि जिल्हास्तरावरील नवोदित अनुक्रमे 05, 05 व 04 अशा प्रकारे खेळाडू निवडण्यात येतील.

यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्राधान्य राहील. परिपूर्ण संघाच्या बांधणीकरीता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खेळाडू उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील खेळाडूंना संधी देण्यात येईल.

या संघामध्ये निवड होणा-या खेळाडूंची 11 महिने करार पध्दतीने मासिक रु.15000/- इतक्या मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येईल.त्याचबरोबर खेळाडूंना सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा व आवश्यक क्रीडा साहित्य महापालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल. देशांतर्गत होणा-या सर्व अधिकृत स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी होता येईल, ज्यामुळे खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यात भर पडून त्यांची कामगिरी उंचावण्यास निश्चितच मदत होईल.अशा प्रकारे एकाच वेळी तीन खेळांचे खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करणारी नवी मुंबई राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर असून महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र व प्रतिभावंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे अशा योजना महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू दत्तक घेऊन कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल खेळाचे संघ तयार करण्यात येणार असल्याने या खेळाच्या खेळाडूंना नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघात खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे या संघांच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या नावलौकिकातही लक्षणीय भर पडणार आहे. तरी यासाठी पात्र व इच्छुक खेळाडूंनी 25 एप्रिल 2017 पर्यंत आपले लेखी अर्ज सादर करावयाचे असून महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. तरी पात्र खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

नेरूळमध्ये दोन दिवसांपूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर तिसऱ्या दिवशी पालिकेचे पुन्हा खोदकाम

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

Next Post
शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची मनसेची मागणी

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची मनसेची मागणी

‘फ्री होल्ड’ विषयी आ. मंदा म्हात्रेंचे रहीवाशांना मार्गदर्शन

‘फ्री होल्ड’ विषयी आ. मंदा म्हात्रेंचे रहीवाशांना मार्गदर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com