• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 20, 2016

नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाला बेदम मारहाण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पोलिस, रेल्वे व सिडकोच्या उदासिनतेमुळे नेरूळ रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बनले तळीरामांचा अड्डा

नवी मुंबई ः नेरुळ रेल्वे स्थानकालगत रेल्वे रुळाजवळ १७ सप्टेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाच्या पोटामध्ये मारहाण करुन त्याची
हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मृत तरुणाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मृत तरुण अंदाजे २५ वयोगटातील असून १७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृतदेह सीवुडस् कडून नेरुळच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे रुळालगत नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला होता. नेरुळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सदर तरुणाच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नसल्याने पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्याचप्रमाणे मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मृत तरुणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यात मयत तरुणाच्या पोटामध्ये गंभीररित्या मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तींनी सदर तरुणाच्या पोटामध्ये गंभीरपणे मारहाण करुन त्याला जखमी अवस्थेत नेरुळ रेल्वे स्थानकातील रुळा लगत टाकून दिल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाच्या अंगात लाल रंगाचे फुल बाह्याचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. त्याची उंची ५ फुट ५ इंच इतकी असून त्याचा बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या तळहाताच्या पाठीमागील बाजुस नाग आणि त्रिशुलचे चिन्ह गोंदले आहे. सदर तरुणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी नेरुळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नेरुळ पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Previous Post

‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन यापुढेही चालू ठेवा’

Next Post

सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो – जयंत पाटील

Next Post
आज होणार राष्ट्रवादीकडून नेरूळला गुणवंतांचा सत्कार

सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो - जयंत पाटील

प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला – नागराज मंजुळे

प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला - नागराज मंजुळे

अतिरेक्यांच्या शोधासाठी देेशातील सुरक्षा यंत्रणांचा ‘हाय अलर्ट’

अतिरेक्यांच्या शोधासाठी देेशातील सुरक्षा यंत्रणांचा ‘हाय अलर्ट’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com