• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2016

मुंबईत रस्त्यावर ‘पोकेमॉन गो’ खेळण्यास पोलीस बंदीची शक्यता

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईत रस्त्यावर ‘पोकेमॉन गो’ खेळण्यास पोलीस बंदीची शक्यता
  • मुंबई : – सध्या सोशल मिडियावर पोकेमॉन गो गेमबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. भारतामध्ये अजून हा गेम लाँच झालेला नसतानाही त्याचे वेड तरुणाईला लागलं आहे. त्यामुळे गेम लाँच झाल्यानंतर निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी अगोदरच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सतत मोबाईलमध्ये पाहत गेम खेळताना देहभान विसरणा-या अतिउत्साही लोकांमुळे मुंबईत धोके आणि अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ‘पोकेमॉन गो’ विरोधात कंबर कसली असून मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते.
  •  मुंबईत अगोदरच असलेली वाहतुकीच्या समस्येमुळे मुंबईकरांसोबत पोलीसही हैराण आहेत. अशा परिस्थितीत मुंबईच्या रस्त्यांवर पोकेमॉन पकडण्यासाठी गेमर्स उतरले तर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातील.  त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेच कठोर नियमावली आखण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी यासंबंधी ट्विटरवरुन एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. 
    ‘पोकेमॉन गो’ खेळताना अपघात झाल्यास मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. गेम खेळताना सतत मोबाईलमध्ये पाहत असल्याने समोर किंवा आजूबाजूला दुर्लक्ष होतं, ज्यामुळे अपघाताची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मुंबई पोलीस ट्विटरसारख्या सोशल मीडियावरुन जनजागृती करणार आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी कठोर नियमावलीही आखण्यात येणार आहे. ही नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी पोकेमॉन गो भररस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात, अशी माहिती आहे.
     

    काय आहे पोकेमॉन गो?

    नितांदो या जपानी कंपनीने हा खेळ विकसित केला असून, पोकेमॉन गो असे या खेळाचे नाव आहे. या कंपनीने आठवडाभरापूर्वी हा खेळ विकसित केला आहे. हा खेळ भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध झाला नसला, तरीही पायरेटेड व्हर्जन या अ‍ॅप्सद्वारे हा खेळ मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येतो. इंटरनेटद्वारे पोकेमॉन गो हा खेळ खेळता येत असून, पोकेमॉन गोला शोधता येते.

    या खेळामधील पोकेमॉन गोला शोधण्यासाठी ज्या दिशेला पोकेमॉन असण्याची दिशा मिळते. त्या दिशेला तरुणाई मोबाइल घेऊन तरुणाई भरकटते. यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खेळाच्या आहारी गेल्यास मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असून, तरुणांचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनी या खेळाकडे दुर्लक्षच केलेले बरे आहे. – डॉ. किरण गुजर, मानसोपचारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

    कसा खेळायचा पोकेमॉन – 

    अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते. ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी प्रत्यक्ष घराबाहेर पडणे हे भाग पडते आणि जास्तीतजास्त पोकेमॉन पकडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावे लागते. दुसरी बाब अशी की हा गेम एकट्याने जरी खेळावा लागत असला तरी तो खेळणारे इतर लोक हे तुमच्यासोबत स्पर्धा करतात.
Previous Post

आयूक्त मुंढेंनी मांडला तीन महिन्यांचा लेखा-जोखा

Next Post

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

Next Post
नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चे तीन नगरसेवक निलंबीत

शिरवणेतील किरण बारवर पोलिसांच्या छाप्यात ३ बारबाला जेरबंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com