• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2016

ममताला दोन वर्षापूर्वी केनियात भेटले

adminbyadmin
in ठाणे
0
ममता कु लकर्णीची मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये बँक खाती

मोलीना कुलकर्णीचा पोलिसांकडे खुलासा

ठाणे : ममताच्या आग्रहाखातर तिला भेटण्यासाठी केनियात गेले होते. तिथे आमची भेट झाली, पण विकीशी भेट किंवा बातचीतही झाली नाही. गेल्या १५ वर्षात तिने आपल्याला पैसेही दिले नसल्याचा दावा दाक्षिणात्य अभिनेत्री मोलीना कुलकर्णी हिने ठाणे पोलिसांकडे केला आहे.

सोमवारी तिने आपला जबाब नोंदवल्यानंतर बुधवारी पुन्हा तिचा पुरवणी जबाब नोंदवण्यासाठी ती ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात आली होती. त्या वेळी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या पथकाला तिने ही माहिती दिली. मोलीना (रा. मीरा रोड, ठाणे), मोनिका (रा. बंगलोर) आणि ममता (रा. अंधेरी, सध्या केनिया) अशा तिघी बहिणी असून त्यांना आरटीओ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वडील मुकुंद कुलकर्णी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये दिले. त्याच पैशांची बँकेत गुंतवणूक करून गुजराण करीत आहेत. काही वर्षापूर्वी मोलीनाने दाक्षिणी चित्रपटांमध्येही काम केले. आता आपण साईबाबांची निस्सीम भक्ती करत असल्याचेही ती म्हणाली. 1986 मध्ये विवाह झाला. पण, पतीच्या त्रसाला कंटाळून त्याच्याशी १९८९ पासूनच फारकत घेतली. २००० पूर्वी ममता पैसे द्यायची. त्यानंतर, तिने पैसे देणो बंद केले. एकटीच असल्यामुळे गरजाही फार नाहीत. त्यामुळे फारसे पैसेही लागत नाहीत, म्हणून ममताकडून पैसे घेण्याचाही प्रश्नच नाही. २००२ पर्यत ममता मुंबईतच (भारतात) होती. त्यानंतर, ती दुबईत गेली. ममताच्या आग्रहाखातर २०१४ मध्ये तिला भेटण्यासाठी केनियात गेले. तिथे तिची भेट झाली. त्या काळात विकी एकदा घरी आला. पण, त्याच्याशी बातचीत किंवा भेटही झाली नाही.

विकीला ममताची मदत

दुबईत विकी गोस्वामीला अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तिथे त्याला शेख अदालतीमार्फत सोडवण्यासाठी ममताने विशेष प्रयत्न केले. त्याच अदालतीने त्याची शिक्षाही माफ केल्याची माहिती सूत्रंनी दिली.

निर्मात्यांचा बहिष्कार

२००३ मध्ये ममता बुरखा घालून फिरायची. त्याच काळात तिचे तोकडय़ा कपडय़ांतील काही मॉडेलिंगचे फोटो प्रदर्शित झाल्यामुळे ती एकदमच चर्चेत आली. शिवसेनेसह काही निर्मात्यांनीही तिच्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतरच ती विकी गोस्वामीकडे दुबईत गेल्याची चर्चा होती.

…………

बंगलोरमध्ये राहणारी मोनिका ही दोन क्रमांकाची बहीण असून ती आजारी असते. तिघी बहिणी स्वतंत्र वेगवेगळ्या असून आईवडिलांचे निधन झाले आहे. मोलीनाने ही सर्व माहिती दिली असली तरी तिच्या बँक खात्यांची पडताळणी केली जाणार असून गरज पडल्यास तिला पुन्हा चौकशीला बोलवले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम साळुंखे यांनी सांगितले.

Previous Post

विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ? अकरावी ऑनलाईन प्रवेश

Next Post

एपीएमसीमध्ये १३०० टन भाजीमाल दाखल!

Next Post
मार्केट बंदबरोबर फेरीवालेही गायब

एपीएमसीमध्ये १३०० टन भाजीमाल दाखल!

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

अन्यथा आयुक्तांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - आ. म्हात्रे

दिघ्यात बालविवाह, २५ वर्षीय युवकाचा ९ वर्षीय मुलीसोबत विवाह

चेकमेट दरोडा : ५ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com