• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2016

मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स

 

  • मुंबई : –  उन्हाच्या रणरणत्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. अशा या चिंब पावसात भिजण्यासाठी लहानथोर सर्वजण नेहमीच तयार असतात. पावसाळी वातावरणात मित्र-मैत्रिणी वा कुटुंबियासह ट्रेक व पिकनिकला जाऊन पावसाळ्याचा आनंद लुटणं कोणाला नाही आवडणार? मुंबईतील अशाच काही ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी…
     
    1) कोंडेश्वर धबधबा-  बदलापूर
    मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात.
    कसे जाल : तेथे जाण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच अन्यथा बदलापूरला उतरून टमटमही मिळू शकते.
     
    2) माळशेज घाट-  कल्याण-मुरबाड मार्ग
    मुंबईतील ट्रेकर्स व पिकनकिसाठी जाणा-या तरूणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात हिरवाईने अक्षरश: नटलेला असतो.  या घाटातील मनोरम दृश्यं, कड्यांवरून कोसळणारा पाऊस आणि तेथील धबधबे यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यात येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. तसेच घाटाच्या पायथ्याशी अनके चांगली रिसोर्ट्स असून उत्तम जेवण मिळते.
     
    3) पळस दरी – 
    मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे गाव पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवाईची झालर, जवळच असलेला सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक व ट्रेकर्ससाठी एकदम चर्चेत असतो. 
     
    ४) कान्हेरी – बोरीवली
    मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही निवांत ठिकाणे असून उपनगरातील आवडता पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणजे कान्हेरी.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे असून कॉलेज तरुणांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी अनेक बस उबलब्ध आहेत. 
     
    ५) भिवपुरी धबधबा- भिवपुरी
    मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी पाउलवाट अवघ्या अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे नेते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येतं आणि त्याचमुळे हा धबधबा सेफ असून वीकेंड्सना येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. स्थानकाजवळ काही हॉटेल्स असून तेथे चांगले जेवळ मिळते.
     
    ६)  माथेरान –
    भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ स्टेशनला उतरून मिनी ट्रेनद्वारे माथेरानला जाताना खूप मजा येते. तसेच नेरळ ते माथेरान या ट्रेनप्रवासादरम्यान अनेक धबधबेही लागतात. अनेक पर्यटक तेथे उतरून धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. 
     
    ७)  तुंगारेश्वर –  मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, वसई.
    मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिकही आहे आणि एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. वसईजवळील हा प्रसिद्ध धबधबा असून तेथे प्रसिद्ध शिवमंदिरही आहे. तेथे नदी आणि धबधबा अशा दोन्हींचा आनंद घेता येतो. वसई रोड स्थानकावरून एसटीने तुंगारेश्वरला जाता येते. डोंगरावर खाण्यापिण्याची सोय नसली तरी तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची सर्व सोय उपलब्ध असते. 
     
Previous Post

शहरातील साफसफाईवर लक्ष द्यावे : आमदार मंदा म्हात्रे

Next Post

‘ट्री-बेल्ट’ विकसित करून युध्दपातळीवर वृक्षारोपण करण्याची मागणी

Next Post
‘ट्री-बेल्ट’ विकसित करून युध्दपातळीवर वृक्षारोपण करण्याची मागणी

‘ट्री-बेल्ट’ विकसित करून युध्दपातळीवर वृक्षारोपण करण्याची मागणी

दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लिल चाळे

‘आंबेडकर भवन’ गुंडांचा अड्डा बनले होते!

‘आंबेडकर भवन’ गुंडांचा अड्डा बनले होते!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com