• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2016

यापुढे, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत माझी ताकद : रामचंद्र घरत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
यापुढे, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत माझी ताकद : रामचंद्र घरत
 नवी मुंबई  : प्रत्येक भाजपा कार्यकर्ता आणि पदाधिकारीसोबत माझी सर्व ताकद असेल, त्यामुळे कोणीही स्वतःला एकटे समजू नये अशी सिंहगर्जना नवी मुंबई भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली. वाशी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री. घरत बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर नवी मुंबई भाजपा प्रभारी संजय उपाध्येय, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षण सम्राट डॉ. राजेश पाटील, नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेविका विजया घरत, विकास झंजाड, संपत शेवाळे, मारुती भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक तथा महापालिकेतील गटनेते रामचंद्र घरत यांची नियुक्ती झाली आहे. ह्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीचे औचित्य साधून नवी मुंबई भाजपा, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी व संलग्न संघटनांच्या माध्यमातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा नागरी सत्कार सोहळा वाशी येथील देवज्ञ सभागृहात आयोजित केला होता. ह्या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना, श्री. घरत यांनी यापुढे शहरातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याने न डगमगता पक्ष बांधणीत आणि लोकसेवेत निस्वार्थपणे स्वतःला झोकूण द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर, यापुढे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासोबत मी आणि माझी सर्व ताकद असेल याची ग्वाहीही श्री. घरत यांनी उपस्थितांना दिली. तसेच, पक्ष बांधणीसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या समाजउन्नतीच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणार असल्याचेही श्री. घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले. “पक्ष संघटना बांधणीतील एक अनुभवी कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष म्हणून रामचंद्र घरत यांच्या रूपाने शहराला लाभला असल्याने, येणाऱ्या काळात शहरातील प्रत्येक वार्डात भाजपाचा झेंडा डौलाने फडकणार” असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मांडले. तर, आमदार मंदाताई म्हात्रे ह्या सिंहणी असून त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे वाटचाल करणाऱ्या रामचंद्र घरत ह्या सिंहाला माझ्या शुभेच्छा असून, त्यांनी नवी मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर विराजमान करावा अशी इच्छा शहर प्रभारी संजय उपाध्येय यांनी व्यक्त केली.
Previous Post

श्री कुलस्वामीच्या कर्मचा-यांना ’१५ टक्के’ वेतनवाढ

Next Post

कालच्या गोंधळानंतर आज म.रे.चा पुन्हा खोळंबा, प्रवासी अडकले

Next Post

कालच्या गोंधळानंतर आज म.रे.चा पुन्हा खोळंबा, प्रवासी अडकले

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले

प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका

प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com