• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2016

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

सातारा : सैराटमधील रक्ताळलेल्या ठशांनी मनावर खोल जखम केली, ज्यावर खपली धरण्याआधी साताऱ्यात ‘सैराट’शी साम्य असणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून पती-पत्नीही दोघेही बचावले. तसंच दोन वर्षांचा मुलगा शेजारी गेल्याने तो सुखरुप आहे.

 गजवडी गावातील विनायक कदम आणि उषा यांचा प्रेमविवाह झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा विरोध झुगारुन त्यांनी चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि साताऱ्याबाहेर राहत होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

 यात्रेनिमित्त हे पती-पत्नी गावात आले होते. याची माहिती मिळल्यानंतर उषा यांच्या नातेवाईकांनी कुऱ्हाड आणि दांड्यांसह विनायक कदम यांच्या घरावर हल्ला केला.

 मुलीचे कुटुंबीय येत असल्याचं समजताच त्यांनी घराचा पुढचा दरवाजा आतून लावला. परंतु हल्लेखोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि विनायक-उषा यांच्यासह घरातील सगळ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुदैवाने हे दाम्पत्यांने तिथून कसाबसा शेताच्या दिशेने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी विनायकच्या कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांना जखमी केलं.

 महत्त्वाची बाब म्हणजे आजीने दोन वर्षांच्या मुलाला बाहेर नेलं होतं, म्हणून त्याचा जीव वाचला.

 घटनेची माहिती मिळताच पोलिस तिथे दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. शंकर कदम, अश्विन कदम, दिनकर कदम, नामदेव कदम, लता कदम, अनिता कदम अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर यातील एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 या घटनेनंतर गजवडी भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Previous Post

पनवेल लवकरच महानगरपालिका

Next Post

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

Next Post
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com