• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 9, 2016

उच्चभ्रू कुटुंबातलं बुरसटलेलं जीणं, फक्त मुलगा जन्मालाघालण्यासाठी केलं लग्न !

adminbyadmin
in ठाणे
0
उच्चभ्रू कुटुंबातलं बुरसटलेलं जीणं, फक्त मुलगा जन्मालाघालण्यासाठी केलं लग्न !

 

ठाणे : एखाद्या टीव्ही सिरियलमध्ये घडावा असा प्रसंग एका अभागी मातेसोबत घडलाय. फक्त मुलांच्या हव्यासपोटी लग्न करुन महिलेला वार्यावर सोडण्याची घटना ठाण्यामध्ये घडलीये. अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा ताबा मिळविण्यासाठी गेली दीड वर्षे एक आई शक्य असेल त्या सगळ्यांचे दरवाजे ठोठावतीये. मात्र अजून तिला न्याय मिळालेला नाहीये. गेली दीड वर्ष ही महिला कोर्टाचे उंबरठे झिजवत आहे. काहीही करा पण माझे बाळ मला परत मिळवून द्या असा टाहो ही अभागी माता फोडत आहे.
कुसुम मनोहर लेले या सुप्रसिद्ध नाटकाशी साधर्म्य असलेली सत्य घटना ठाण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबात घडली आहे. केवळ मुलासाठी एका युवतीशी लग्न करून तिला परत माहेरी हाकलून देण्याची घटना उघड झाल्याने एक आई आपल्या बाळापासून तोडली गेली आहे. ७ फेब्रुवारी २०१० रोजी मुळची ठाण्याची असलेल्या अनामिका (नाव बदलले आहे) चा विवाह नाशिकच्या ऋषिकेश सुरेंद्र कर्डिले या युवकाशी मोठ्या थाटामाटात झाला. सुवर्ण भविष्याची स्वप्ने रंगवत लग्नाच्या ६ महिन्यांतच ती पती बरोबर लंडन येथे गेली आणि आपल्या नवीन संसारास सुरुवात केली.
काही महिन्यातच तिला बाळाची चाहूल लागली आणि ती आनंदली. परंतु तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण तिच्या नवर्याने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. लहान सहान गोष्टींवरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. त्यातच तिला एक गोंडस बाळ झाले. परंतु तिचा छळ काही संपला नाही उलट गोष्टी इतक्या थराला गेल्या की, तिच्या सासरच्यांनी तिचे बाळ हिरावून घेऊन तिला भारतात पाठवून दिले. आम्हाला जे हवे होते ते मिळाले आता तुझी गरज नाही असे सांगत त्यांनी आपला विखारी हेतू स्पष्ट केला.
भारतात आल्यावर तिने कोर्टात दावे दाखल करून कायदेशीर लढाई सुरू केली. त्यात तिला यशही आले. मुलाचा ताबा आईकडे देण्यात यावा असा निकाल कोर्टाने दिला मात्र इंग्लंडमध्ये असलेल्या ऋषिकेशने सर्व निकाल धुडकावले असल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला असून आपल्या अजाण बालकाचा ताबा कसा मिळणार या विवंचनेत ती अभागी माता आहे.
मुळचा नाशिक येथील ऋषिकेश सुरेंद्र कर्डिले हा लंडन अँड पार्टनर या कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मेनेजर या पदावर कामाला असून नाशिकच्या जेल रोडवर एमएसइबी कॉलनीत आजही ऋषिकेशची आई सुरेखा, वडील सुरेंद्र कर्डिले राहतात तर बहिण मृणालिनी कौशिक देशपांडे ही सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. तर आई नाशिकच्या प्रख्यात आदर्श विद्यालयात मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाली आहे. एवढी शिक्षित परिवार देखील असे करू शकतो यावर माचा देखील विश्वास बसत नाही असं अनामिका आणि तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे.
शेवटी १८ जानेवारी २०१६ रोजी ऋषीकेशवर नॉन बेलेबल वारंट बजावण्यात आले आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट २०१५ रोजी ठाणे फमिली कोर्टाने अनामिकाचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. असून दर महा २० हजार रुपये ,तसंच मुलाचा ताबा तत्काळ आईकडे द्यावा असे आदेश ऋषिकेशला दिले आहेत. तर जेएमएफसी कोर्टाने सुजाताला राहाण्याचा खर्च २० हजार दर महिना आणि पोटगी २० हजार दर महा द्यावेत असे आदेश ३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले आहेत. हताश झालेल्या अनामिका च्या पित्याने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले असून न्यायाच्या प्रतिक्षेत

Previous Post

आयएनएस विराटचं ५०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये होणार रुपांतर !

Next Post

श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

Next Post
श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली हणमंथाप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी

मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली हणमंथाप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी

वैतागलेल्या आरोपीकडून कोर्टातच जजवर चप्पलफेक

वैतागलेल्या आरोपीकडून कोर्टातच जजवर चप्पलफेक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com