• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 2, 2016

एका रेल्वेच्या तिकीटावरुन पोलिसांनी १० दिवसांत लावला शोध

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
एका रेल्वेच्या तिकीटावरुन पोलिसांनी १० दिवसांत लावला शोध

मुंबई : मृतदेहाजवळ सापडलेल्या एका तिकीटावरून पोलिसांनी चक्क१० दिवसांत खुन्याचा शोध घेतलाय. वाळीव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावलाय. २१ जानेवारी रोजी सुसाई रोड घोडबंदर येथे एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. या अनोळख्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे केवळ एक तिकीट होते. या तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
या एका तिकीटावरुन पोलिसांनी तपासास सुरुवात केली. मुंबई सेंट्रल ते नालासोपारा प्रवासाचे ते तिकीट होते. यादरम्यान या तरुणाशी संबंधित हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे की नाही हे तपासले. तसेच मुंबई सेंट्रल स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजही तपासले. याच तपासादरम्यान त्यांना या प्रकरणासंबंधित पहिला धागा सापडला. या तरुणाच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरुन त्या तरुणाची ओळख पटली. त्याचे नाव होते मशूक अली आणि तो वांद्रेतील खेरवाडी येथे राहणारा होता.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मशूकच्या वडिलांना कळवले. मशूक आणि त्याचे वडील प्रोफेशनल मसाजर होते. जेव्हा पोलिसांनी मशूकच्या वडिलांना सीसीटीव्ही फूटेज दाखवले त्यावेळी सीसीटीव्हीत मशूकसोबत जावेद मारेडिया असल्याचे वडिलांनी पाहिले. जावेद हा मशूकचा मित्र होता.
त्यानंतर ३० जानेवारी रोजी पोलिसांनी जावेदला अटक केली आणि खुनाचा अखेर उलगडा झाला. ३० वर्षीय जावेद स्वीट शॉपमध्ये कामाला होता. मशूकच्या आक्षेपार्ह फोटोवरुन जावेद त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. यातूनच त्याने मशूकची हत्या केली.
३० जानेवारी रोजी जावेदला अटक करण्यात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी ठाणे कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

एक बहूजन वर्गातील रणरागिनी

Next Post

आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे घणसोली नोडमध्ये सिडकोकडून विकासकामे

Next Post
आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे घणसोली नोडमध्ये सिडकोकडून विकासकामे

आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे घणसोली नोडमध्ये सिडकोकडून विकासकामे

नेरूळ सेक्टर ६ येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

नेरूळ सेक्टर ६ येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

नवी मुंबईतील पानथळकेंद्र राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ ठरेल

नवी मुंबईतील पानथळकेंद्र राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ ठरेल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com