• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2016

केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

adminbyadmin
in ठाणे
0
केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

कल्याण : बेकायदा बांधकामे, कचर्‍याचे अयोग्य व्यवस्थापन, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसह आर्थिक चणचण अशा समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या कल्याणडोंबिवली महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी असलेला अर्थसंकल्प महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर केला.
पालिकेची आर्थिक तूट कमी करण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली आकारण्याचे संकेत, नाटयगृहांचे खासगीकरण, पालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे अशा उपाययोजना वापरण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे. त्याच वेळी सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास वेगवान आणि सुलभ व्हावा, यासाठी शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांची बांधणी, समांतर रस्त्यांची उभारणी अशा प्रकल्पांची घोषणाही आयुक्तांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कामाने सर्वाचे लक्ष वेधून घेणारे रवींद्रन आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात काय मांडतात याविषयी महापालिका वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. अर्थसंकल्प विलंबाने सादर करण्याची आधीच्या आयुक्तांची प्रथा मोडीत काढत रवींद्रन यांनी सोमवारी १६६३ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला. त्यासोबतच सन २०१५१६ चा ११३५ कोटींचा जमा व १०८९ कोटी खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प या वेळी प्रशासनाने सादर केला.
पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या मालमत्ता भाड्याने देण्यात येणार आहेत. व्यावसायिक गाळे अधिमूल्य आकारून दीर्घ मुदतीसाठी भाड्याने देण्यात येणार आहेत. तसेच ‘पैसे मोजा आणि वाहने उभी करा’ या धर्तीवर वाहनतळ धोरण राबवण्यात येणार आहे. याशिवाय मालमत्ता, पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नसली तरी येत्या काळात मालमत्तांच्या भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू केली जाईल असे संकेत या अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. त्यामुळे ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराच्या घरांमध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या करात अंशत: वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाण्याच्या नियोजनासाठी टेलीस्कोपिक पद्धतीचा वापर करून पाणी दरवाढ करण्यात येईल, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
आर्थिक पातळीवर पालिकेचा कारभार सक्षम करण्याचा प्रयत्न करतानाच आयुक्तांनी कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास वेगवान करण्याची हमीदेखील दिली आहे. त्यानुसार, डोंबिवली ठाणे समांतर रस्ता, कल्याण डोंबिवली समांतर रस्ता, डोंबिवली टिटवाळा बाह्यवळण रस्ता, मलंग रस्ता ते नेवाळी रस्ता रुंदीकरण, वडवली टिटवाळा समांतर रस्ता तयार करणे, ठाकुर्ली, मोहने, वालधुनी उड्डाणपुलाची उभारणी अशा प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालिकेत नव्याने समावेश झालेल्या २७ गावांच्या सर्वागीण विकास करण्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या विकासनिधीतून गावांमध्ये प्राथमिक शिक्षण, आरोग्य, घनकचरा, मल, रस्ते, उद्याने व पाणीपुरवठा प्रकल्पांवर खर्च करण्यात येणार आहे.

Previous Post

कर्नाटकच्या मंत्र्याने अनावधानाने वाहिली शदर पवार यांना श्रद्धांजली

Next Post

मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

Next Post
मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

चौथरा प्रवेशाच्या आंदोलनाला आध्यात्मिक गुरू रविशंकर यांचा पाठिंबा

चौथरा प्रवेशाच्या आंदोलनाला आध्यात्मिक गुरू रविशंकर यांचा पाठिंबा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com