• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 29, 2015

दाऊदच्या मुंबईतील लिलावातील १२ मालमत्ता खरेदी कोण करणार?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दाऊदच्या मुंबईतील लिलावातील १२ मालमत्ता खरेदी कोण करणार?

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बारा मालमत्तांचा लिलाव होणार आहे. छोटा राजनला भारतात आणल्यानंतर आता दाऊदच्या गंडस्थळावर घाव घालण्यासाठी सरकारने मोठा जामानिमा केलाय खरा; पण गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अशा लिलावांचा पूर्वेतिहास पाहता कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्ता विकत घेण्यासाठी कोण पुढे येणार? याबद्दल उत्सुकतेसोबतच साशंकताही आहे. कारण या मालमत्तांची खरेदी म्हणजे थेट दाऊदशी पंगा आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा असा दुहेरी ताप. म्हणूनच या लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे सरकार, पोलिस आणि गुन्हेगारी विश्वाचेही लक्ष लागले आहे.
दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याची मुंबईतील आपल्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर असते. मुंबईत आपल्या सुरुवातीच्या काळात साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून नैतिक किंवा अनैतिक मार्गाने दाऊदने उभ्या केलेल्या साम्राज्याच्या काही खुणा आजही या मालमत्तांच्या रूपाने त्याच्या दहशतीची साक्ष देत या शहरात उभ्या आहेत. पूर्वी कधीकाळी त्याच्या पुढेमागे फिरणारे छाडमाड तरुण आताशा बिल्डर किंवा तत्सम व्यवसायात स्थिरावलेत. तेच आता या मालमत्तांसह त्याचे आर्थिक व्यवहार छुपेपणाने हाताळतात. दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर या मालमत्ता आयकर विभागाने हळूहळू ताब्यात घेतल्या. सरकारी कागदपत्रात आजही या मालमत्ता सील केल्याची नोंद असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दाऊदच्या हस्तकांमार्फत या मालमत्तांचा आजही बिनधास्तपणे व्यावसायिक वापर होतो आहे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असूनसुद्धा सरकारी यंत्रणा काहीच करू शकत नाही. कारण या मालमत्ता सील केल्या तरी त्या अवैधरित्या पुन्हा ताब्यात घेतल्या जातात. यावर उपाय म्हणून आता या मालमत्तांचा लिलाव करण्याचा उपाय आयकर विभागाने आजमावण्याचे ठरवले आहे.
अशा लिलावांना मिळणार्‍या तुरळक प्रतिसादाविषयी माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीदेखील दाऊदच्या एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र हल्ली गुन्हेगारी विश्वाची भीती तितकीशी राहिली नसल्याने यावेळी कदाचित या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल.

** दाऊदच्या मुंबईतील स्थावर मालमत्ता**
* राजगारा मेन्शन, पहिला ते चौथा माळा, बीबी जनपथ
* पाकमोडिया स्ट्रीट क्रमांक ४, भायखळा, मुंबई -०३
* डांबरवाला बिल्डिंग, १७/२१ पाकमोडिया स्ट्रीट, भायखळा, मुंबई-०३
* ३४/ ४० याकूब स्ट्रीट्स, भुलेश्वर
* २४ रेसिडेन्शियल बिल्डिंग, याकूब स्ट्रीट, भुलेश्वर
* २२/३२ इंडस्ट्रियल गाला, शेड नंबर १, जयराजभाई लेन, ताडदेव
* हुमेरा इंजिनिअरिंग वर्क्स, जयराज भाई लेन, ताडदेव
* प्लॉट क्रमांक २२, टेमकर स्ट्रीट, भायखळा, मुंबई ०३
* ९९/१०१ घासवाला बिल्डिंग, टेमकर स्ट्रीट, भायखळा, मुंबई-०३
* गरीबनवाज गेस्ट हाऊस, इस्माईल बिल्डिंग, भायखळा, मुंबई-०३
* म्हाडा बिल्डिंग क्रमांक ४९, मांडवी
* १२, गार्डन हॉल, डोंगरी पोलिस ठाण्यासमोर, दिमतीमकर मार्ग, भायखळा

या जागांचे भाव व्यावसायिक वापरासाठी ३० ते ५० हजार तर निवासी वापरासाठी २० ते २५ हजार रु. प्रति चौरस फूट आहेत. या हिशेबाने ही किंमत अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात जाते, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे आनंद गुप्ता म्हणाले.

Previous Post

महिला स्वच्छतागृहांची अडचण दूर करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांचा पुढाकार

Next Post

प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाची माहिती असणे आवश्यक डॉ. नरेंद्र जाधव

Next Post
प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाची माहिती असणे आवश्यक डॉ. नरेंद्र जाधव

प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाची माहिती असणे आवश्यक डॉ. नरेंद्र जाधव

अवाजवी येत असलेल्या विद्युत देयकांची चौकशी करून सुधारीत विद्युत देयक पाठविण्याची काँग्रेसची मागणी

अवाजवी येत असलेल्या विद्युत देयकांची चौकशी करून सुधारीत विद्युत देयक पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मिरा-भाईंदरकरांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविल्याचा आनंद : संजीव नाईक

मिरा-भाईंदरकरांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविल्याचा आनंद : संजीव नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com