• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2015

‘कसाब’फेम कोठडीत आमदाराची रवानगी!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
‘कसाब’फेम कोठडीत आमदाराची रवानगी!

पुणे : आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी रमेश कदम यांना ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सीआडीचं पथक त्यांच्या मागावर होतं. अखेर पुणे-नगर रस्तावरील ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली होती. रमेश कदमांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आल्याचं पक्षानं जाहीर केलं असलं तरी ज्येष्ठ नेत्यांचा वरदहस्त त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगण्यात येतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कसाब’ फेम या सेलचं वैशिष्ट्य म्हणजे, या सेलमध्ये एअर कंडिशनचीही सोय आहे. एखाद्या वैद्यकीय आणीबाणीप्रसंगी गरज लागल्यास कसाबसाठी ही सोय इथं करण्यात आली होती. २१ नोव्हेंबर २०१२ ला कसाबला फाशी दिल्यानंतर या सेलमध्ये कोणत्याही कैद्याला हलवण्यात आलं नव्हतं.
अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलाय. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केलाय. राष्ट्रवादी कदमांना पाठिशी घालत असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा दावाही ढोबळेंनी केला होता. महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा थेट १३० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संबंध असून त्यांनी कर्ज दिलेल्या संस्था कागदावरच असल्याचा दावा ढोबळेंनी केलाय. कदम यांनी हा पैसा मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी बांधकाम व्यवसायात लावल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Previous Post

मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

Next Post

प्रश्‍नोत्तरांकरता वेळ वाढविण्याची नामदेव भगतांची मागणी

Next Post
नामदेव भगत यांच्या मागणीवर सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद, ‘सिडको बांधणार पाच लाख स्वस्त घरे’

प्रश्‍नोत्तरांकरता वेळ वाढविण्याची नामदेव भगतांची मागणी

महिला स्वच्छतागृहांची अडचण दूर करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांचा पुढाकार

महिला स्वच्छतागृहांची अडचण दूर करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांचा पुढाकार

दाऊदच्या मुंबईतील लिलावातील १२ मालमत्ता खरेदी कोण करणार?

दाऊदच्या मुंबईतील लिलावातील १२ मालमत्ता खरेदी कोण करणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com