• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 22, 2015

धम्मचक्र प्रवर्तन दिनी उसळला भीमसागर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
धम्मचक्र प्रवर्तन दिनी उसळला भीमसागर

नागपूर : बुद्धमं सरणं गच्छामि, धम्ममं सरणं गच्छामि!.च्या मंत्रघोषात विजयादशमी दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 59 वा धम्मचक्र प्र्वतन दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो भीमानुयायांचा सागर दीक्षाभूमीवर उसळला होता.
नागवंशीयांच्या नागपूरात 14 ऑक्टोबर 1956 साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो समाजबांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशात एक नवी धम्मक्रांती केली होती. तो दसरा, ‘विजया दशमी’चा दिवस बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी निवडला होता. त्यामुळे हा दिवस दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
शुभ्र वस्त्रे, पंचशील ध्वज आणि ‘जय भीम’चा नारा देत गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केला.
दीक्षाभूमीवरील बोधीवृक्षाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्या रोपट्याचा तो बोधिवृक्ष आता बहरला आहे.
याच बोधिवृक्षाखाली भिक्खू संघाचे सूत्तपठन सुरू होते. तसेच देशविदेशातून आलेले शेकडो भिक्खूही या पूजेत सहभागी झाले होते. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता बुधवारी आदल्या दिवशीच बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दीक्षाभूमी परिसरात गुरुवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. दीक्षाभूमी परिसरात फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीतील अनेक ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

Previous Post

सिने अभिनेते सयाजी शिंदेंची गोवर्धनी मातेच्या मंदिराला नवरात्रीनिमित्त भेट

Next Post

कल्याणमध्ये रिक्षाचालकाची महिलेला मारहाण

Next Post

कल्याणमध्ये रिक्षाचालकाची महिलेला मारहाण

मनसेच्या गजाननस्त्रामुळे 46 कोटींचा डाळ धान्यसाठा जप्त, व्यापारी व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

मनसेच्या गजाननस्त्रामुळे 46 कोटींचा डाळ धान्यसाठा जप्त, व्यापारी व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

लोकप्रिय गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गुंतलेले पाश चे शनिवारी आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com