• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 26, 2015

वसई-भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळामध्ये बारबालांचा नाच!

adminbyadmin
in ठाणे
0
वसई-भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळामध्ये बारबालांचा नाच!

ठाणे : लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आताच्या गणेशभक्तांनी कुठे नेवून ठेवलाय याच ज्वलंत उदहारण वसईत आणि भाईंदर येथे पाहायला मिळालं. वसई पश्चिमेकडील फेरिवाला सार्वजनिक गणेश मंडळात चक्क नंगा नाच सुरू होता. तर मीरा भाईंदर इथल्या दुध फळ विक्रेता मंडळानं तर चक्क बारबालांनाच नाचवलं. त्यांच्यावर पैसेही उडवले.
लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी गणेश उत्सव सुरू केला. मात्र सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र काही वेगळंच दाखवतंय. वसईतल्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळानं आणि मिरा-भाईंदरच्या दुध फळ विक्रेता मंडळानं नैतिकतेच्या सर्व सिमा ओलांडल्यात. वसईच्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळानं काल सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एका मुलीने अश्‍लील डान्स केला. विशेष म्हणजे इथल्या मंडळाचे लोकं त्या मुलीवर पैसे उडवत होते. तर दुसरीकडे मीरा भाईंदर इथल्या दुध फळ विक्रेता मंडळानं तर चक्क बारबालांनाच नाचवलं. त्यांच्यावर पैसेही उडवले. खरंतर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन होतं. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही. या अश्‍लील डान्सची क्लीप व्हॉट्सऍपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि वसईतल्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळाच्या ४ पदाधिकार्‍यांसहित २ मुली आणि पैसे उडवणार्‍यांसहित १२ जणांवर माणिकपूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी भिभित्स वर्तन केल्या प्रकरणी कलम २९४ प्रमाणं आणि मुंबई पोलीस कायदा ३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि लवकरच या सर्वाना अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर दुसरीकडे या सर्व प्रकाराचा शिवसेनेनं विरोध केलाय. आणि या दोन्ही मंडळांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिलाय.

Previous Post

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापे

Next Post

माजी राज्यपाल रामभाऊ कापसे यांचे वृद्धापकाळाने निधन

Next Post
माजी राज्यपाल रामभाऊ कापसे यांचे वृद्धापकाळाने निधन

माजी राज्यपाल रामभाऊ कापसे यांचे वृद्धापकाळाने निधन

कंडोम चोरणार्‍या मुलीची पित्याने गळा दाबून केली हत्या

मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली

मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com