• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 15, 2015

नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागामार्फत अभियंता दिन साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागामार्फत अभियंता दिन साजरा

सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई महानगरपालिका ज्या सेवा-सुविधा नागरिकांना पुरविते त्यापैकी ८० टक्के सुविधा अभियांत्रिकी विभागाशी संबंधित असतात. त्यामुळे एकप्रकारे नागरिकांच्या अपेक्षांची पुर्ती अभियांत्रिकी विभागामार्फत होत असून अभियंत्यांनी आजवर केलेल्या कामांमुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडलेली असून अभियंता दिन म्हणजे केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी महत्वाचा दिवस असल्याचे मत नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी साजरा केल्या जाणा-या अभियंता दिन समारंभात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपिठावर अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त सेवा डॉ. संजय पत्तीवर, मुख्यालय उप आयुक्त श्री. जगन्नाथ सिन्नरकर, सह शहर अभियंता श्री. जी.व्ही.राव तसेच प्रमुख व्याख्याते प्रा. कर्नल रमेश कामेटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी अभियंता दिन साजरा करताना एक संकल्पना नजरेसमोर ठेवण्यात येते. यावर्षी माहिती तंत्रज्ञान युगातील अभियांत्रिकी आव्हाने ही संकल्पना नजरेसमोर ठेवण्यात आली असल्याचे सांगत शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर यांनी यापुढील काळात स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना नागरिकांच्या सोयीसाठी अडथळा मुक्त पदपथ उपलब्ध करुन देण्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याची भूमिका त्यांनी मांडली. सध्याचे पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन मोरबे धरणामुळे आपल्या शहराला जलसंन्नता लाभली असली तरी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आपल्याकडे सोपविलेल्या कामांच्या पलिकडे जात पुढाकार घेऊन महापालिकेच्या हिताचे काम करणा-या श्री. जसवंत मिस्त्री व श्री. अनिल नेरपगार या कार्यकारी अभियंत्यांचा त्यांनी सन्मान केला. कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई यांनी केलेल्या चांगल्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला.
याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण यांनी देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा महत्वाचा वाटा असून आज बदलत्या काळानुसार माध्यम प्रगतीमुळे आव्हाने वाढली आहेत असे सांगत जे काम आपण हाती घेऊ त्याचे व्यवस्थित नियोजन करणे, कालबध्दता राखणे, उत्तम दर्जा ठेवणे आदी गोष्टींकडे काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणे हे अधिक कठीण असते असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या विकासात अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे व यापुढील काळात आणखी चांगल्या कामांनी हा नावलौकीक उंचावेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. कर्नल रमेश कामेटवार यांनी आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात अभियंत्यांसमोर असलेल्या आव्हानांविषयी अभ्यासपूर्ण भाष्य केले. सिडकोमार्फत उभारण्यात येत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्प स्थळाची पाहणी करुन माहिती घेण्यात आली.

Previous Post

उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राजेंद्र पाटील यांना आपले पद गमवावे लागणार !

Next Post

‘थर’ चित्रपटाच्या मूहूर्त उत्साहात

Next Post
‘थर’ चित्रपटाच्या मूहूर्त उत्साहात

‘थर’ चित्रपटाच्या मूहूर्त उत्साहात

शालेय दाखल्यांची तपासणी करण्याची नामदेव भगतांची मागणी

शालेय दाखल्यांची तपासणी करण्याची नामदेव भगतांची मागणी

मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

तक्रार झाली म्हणून ‘मन की बात’वर बंदी नाही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com