नवी मुंबई : कुकशेत गावाच्या विकासाच्या बाबतीत सुरज पाटील रचिले पाया आणि सुजाताताईने चढविला कळस असेच बोलण्याची वेळ अनुभवाअंती नेरूळ नोडमधील नागरिकांवर आलेली आहे. बुधवारी झालेल्या महासभेत कुकशेत गावात महापालिकेचे विभाग कार्यालय आणण्याचा ठराव महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंजुर झाला आहे.
सुसज्ज व्यायामशाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, नागरी आरोग्य केंद्र यापाठोपाठ काम सुरू असलेले महिलांकरितांचे भाजी व मच्छि मार्केट, मंदिरांचे सुरू असलेले काम, वाहतुक कोंडी होवू नये यासाठी हेवी ड्यूटी गटरे, सुसज्ज व कोणालाही हेवा वाटावे असे क्रिडांगण यासह अन्य नानाविध सुविधा महापालिकेच्या चौथ्या सभागृहात तत्कालीन स्थानिक नगरसेवक व कुकशेतचे भूमीपुत्र असणार्या सुरज पाटलांनी अथक परिश्रमातून महापालिका प्रशासनदरबारी मंजूर करवून घेतल्या. ज्या गोष्टी पूर्वी होत्या, त्याची डागडूजी करत त्यात सुधारणा घडवून आणल्या. त्यानंतर २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या सौ. सुजाताताई सुरज पाटलांकडे या प्रभागाचे नेतृत्व आले. शिक्षणाने प्रगल्भता असलेल्या सुजाता पाटलांनी सुरज पाटलांपेक्षाही गतीमान कामे करत, पालिकेकडून निधी मिळविताना कुकशेत, सारसोळे या गावांसोबत नेरूळ सेक्टर सहामध्ये विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे मागील सव्वा तीन वर्षात पहावयास मिळाले असल्याने कुकशेतवासियांकडून सौ. सुजाताताईंना ‘शाबास सूनबाई’ ही उपाधी सार्वजनिकरित्या प्राप्त होवू लागली आहे. जे सुरज पाटलांना जमले नाही, ते सौ. सुजाताताई सुरज पाटील गतीमान विकासकामांमध्ये व निधी आणण्यामध्ये करून दाखविल्याने घरसंसार सक्षमपणे सांभाळणारी महिलाही प्रभागाची धुरा तितक्याच आस्थेवाईकपणे सांभाळू शकते हे सुजाताताईंनी कृतीतून करून दाखविले आहे.
साधारणत: दशक भरापुर्वी नवीमुंबईमध्येे बहुतांश नागरिकांना माहीत नसलेले कुकशेत गाव २०१० च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी पासुन विकासकामांमुळे नवी मुंबईमध्येे वारंवार उल्लेखित होऊ लागले. नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे सुरज पाटील नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर विधानसभेतील पहीली इंग्रजी माध्यम असलेली शाळा, बारबाला मुक्त गाव, हिरवळ युक्त मैदान, मनपाची अत्याधुनिक व्यायामशाळा, महीला भवन, आरोग्य केंद्र , मार्केट अशा अनेक विकासकामांमुळे नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये विकसित गाव म्हनुन चर्चेत आले आहे. २०१५ च्या निवडणुकीत सौ. सुजाता सुरज पाटील नगरसेवकपदी निवडुन आल्यापासून सुरज पाटलांच्या मार्गदर्शनाखाली तोच विकासकामांचा सातत्यपणा सौ. सुजाता सुरज पाटील यांनी कायम ठेवला आहे. सारसोळे सेक्टर ६ मध्ये विकासकामांकरीता मंजुर करुन घेतलेल्या भरघोस निधीपाठोपाठ मागील महासभेत कुकशेत गावतील घराघरासमोरील पार्किंग समस्या दुर करण्यासाठी हेवी ड्यूटी गटर, पदपथ बांधण्याकरिता २ कोटी ६५ लाख एवढा निधी मंजुर करण्यात यशस्वी झाल्या. तसेच संपुर्ण कुकशेत गावात सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महानगर गॅस घरोघरी पोहोचविण्याकरिता मंजुरी मिळविली असुन पहिल्या टप्प्यातिल सर्वेक्षणाचे कामही पुर्णत्वास आले आहे. ऑक्टोंबर महीन्यात झालेल्या महासभेत सारसोळे सेक्टर ६ परीसराकरीता गटर पदपथ नूतनीकरण यासाठी २ कोटी ४५ लाख एवढा निधी मंजुर करुन घेण्यासोबत मंगळवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेत कुकशेत येथील भूखंड क्रमांक पी-८, पी- ९ येथे नेरुळ विभाग कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजुर करुन घेण्यात यशस्वी झाल्या आहेत. यापुढे नेरुळ मधील नागरीकांना प्रशासकीय कामाकरीता कुकशेत गावात यावे लागणार आहे, साहजिकच यामुळे कुकशेत गावचे महत्वही वाढणार आहे. कुकशेत गावात प्रशासकीय कामाकरिता ज्यावेळी पालिका विभाग कार्यालय कार्यक्षेत्रातील अन्य प्रभागातील रहीवाशी ज्यावेळी येतील, त्यावेळी त्यांना पाटील दांपत्याने केलेला विकासकामांचा महिमा पहावयास मिळेल. महीला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अशा ह्या प्रसाकीय भवनाने कुकशेत गावच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी परिसरात विकासकामे करताना आपल्या मवाळ व विनम्र स्वभावामुळे माणसे जोडण्याचेही काम केले आहे. जमिनीवर पाय नसणारे नगरसेवक पाहण्याची सवय असणार्या नवी मुंबईकरांना लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित, विनम्र व अभ्यासूही असून शकतो याचे उत्तम उदाहरण सुजाताताईच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे.