• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2015

कामगार व प्रशासन समन्वयाकरता महापौरांचा पुढाकार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कामगार व प्रशासन समन्वयाकरता महापौरांचा पुढाकार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या विभागांतील कंत्राटदाराकडे कार्यरत असणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत कामगार संघटना व समाजातील विविध घटकांकडून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांचेकडे प्राप्त निवदेनांनुसार त्यांनी प्रशासन व कंत्राटदार यांची विशेष समन्वय बैठक घेऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली व यामधून कामगारहिताचा समाधानकारक मार्ग काढण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ. संजय पत्तीवार, अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नररकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता मोहन डगांवकर, सह शहर अभियंता जी. व्ही. राव, प्र. मुख्य लेखा वित्त अधिकारी रमाकांत पाटील आणि संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये प्रशासन व कंत्राटदार यांच्यांशी झालेल्या चर्चेमध्ये कंत्राटदारांचे दायित्व स्पष्ट करण्यात आले असून ते कंत्राटदारांनी मान्य केल्यामुळे मागील दीड- दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विषयांबाबत तोडगा काढण्यात आला. यात कंत्राटदारांकडून त्यांच्या दायित्वाबाबत हमीपत्र घेण्यात येऊन कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असल्यास ते तात्काळ अदा करणेबाबत प्रशासनाला व संबंधित ठेकेदारांना निर्देशित करण्यात आले.
याशिवाय कंत्राटी कर्मचार्‍यांच्या आणखी काही समस्या असल्यास त्यांचा सर्वसमावेशक विचार करण्यात येईल असे नमूद करीत कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण होऊ नये व सदर कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा याकरीता सामाजिक बांधिलकी जपत समान कामास समान वेतन देणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले. सदर धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर या विषयाच्या तज्ज्ञ व्यक्तींचे अभिप्राय घेऊन सुवर्णमध्य साधण्यात येईल असे त्यांनी आश्वासित केले. यावर संबंधित कंत्राटदारांनी त्यांच्यावरील दायित्व पार पाडण्याची हमी देत कंत्राटी कामगारांचे वेतन तात्काळ अदा करण्यात येईल असे बैठकीमध्ये सूचित केले, त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापौर सुधाकर सोनवणे यांनी पुढाकार घेऊन महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात समन्वय घडविणारी बैठक घेऊन कामगार हिताची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

कोपरखैराणेत रविवारपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा

Next Post

स्वीकृत नगरसेवकांसह परिवहन सदस्यांची निवड जाहीर

Next Post
स्वीकृत नगरसेवकांसह परिवहन सदस्यांची निवड जाहीर

स्वीकृत नगरसेवकांसह परिवहन सदस्यांची निवड जाहीर

महापालिका प्रशासनाकडून सन्मान गुणवंतांचा

महापालिका प्रशासनाकडून सन्मान गुणवंतांचा

कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकला साडे चार लाख कंडोम्सचा पुरवठा

कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकला साडे चार लाख कंडोम्सचा पुरवठा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com