• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 21, 2025

शालेय सहली कायमच्या बंद कराव्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन होईल: गजानन काळे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शालेय सहली कायमच्या बंद कराव्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन होईल: गजानन काळे

नवी मुंबई मनसेची इमॅजिका पार्कला धडक

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com :८३६९९२४६४६

नवी मुंबई (प्रतिनिधी) : रखरखत्या उन्हात शालेय सहल काढणे अत्यंत चूक आहे. इमॅजिका पार्क ने पुरेशी पाण्याची व्यवस्था न करणे तसेच जेवणासाठी चायनीज ठेवणे हे व्यवस्थापनाच्या मूर्खपणाचे लक्षण आहे. अशा अनेक चुका इमॅजिका पार्क व्यवस्थापनाने करूनही आयुष सिंग याच्या पालकांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. याबद्दल ही तीव्र नाराजी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच इमॅजिका पार्क ने या पुढे शासन निर्णयानुसार शालेय सहली आयोजित करू नये अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल असा इशाराही मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान १२०० विद्यार्थ्यांना घेवून खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती. यावेळी घणसोली शाळा क्र. ७६ येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग वय वर्ष १४ या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन, नवी मुंबई मनपाचे प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे प्रवक्ते, मनविसे सरचिटणीस, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमॅजिका पार्क चे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली. शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक ठिकाणीच शाळा सहल नेऊ शकतात असा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय असताना इमॅजिका पार्क या सहली आयोजित कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. नफेखोरीसाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. इमॅजिका पार्ककडे झालेल्या घटनेचा अहवाल मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मागवला असता इमॅजिका पार्क व्यवस्थापनाकडे असा अहवाल उपस्थित नसताना बघून सर्वांनी राग व्यक्त केला.

उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुद्धा इमॅजिका पार्क वर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी असे ही सांगण्यात आले.

मनसेच्या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्ना बनसोडे, मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, नवी मुंबई मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, , मनसे कामगार सेना सरचिटणीस अभिषेक दर्गे, माथाडी सेना सरचिटणीस महेश सोगे, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडसकर, मनसे नवी मुंबई विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, अक्षय भोसले, नितीन नाईक, शाम ढमाले, रोहन पाटील, विशाल चव्हाण, सनप्रीत तुर्मेकर, रायगड जिल्हा विद्यार्थिनी अध्यक्ष रुचिता सोनार, मनविसे कर्जत तालुका अध्यक्ष प्रविण राणे, मनविसे खालापूर तालुका अध्यक्ष चेतन चोगले, भारती ताई कांबळे, अनिकेत पाटील, प्रतिक खेडकर, मधुर कोळी, प्रद्युमन हेगडे आदी उपस्थित होते.

Previous Post

उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्याची मागणी

Next Post

               ‘मनुभाई ज्वेलर्स’आयोजित  ज्वेलरी प्रदर्शन सोहळ्याचे आ. मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन

Next Post
               ‘मनुभाई ज्वेलर्स’आयोजित  ज्वेलरी प्रदर्शन सोहळ्याचे आ. मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन

               ‘मनुभाई ज्वेलर्स’आयोजित  ज्वेलरी प्रदर्शन सोहळ्याचे आ. मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन

टूक-टूक सुरूच: पानगळतीमुळे तांबट पक्ष्याचे दर्शन सुलभ

टूक-टूक सुरूच: पानगळतीमुळे तांबट पक्ष्याचे दर्शन सुलभ

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com