• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 5, 2025

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पनवेलमध्ये भरणार यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धा

adminbyadmin
in पनवेल
0
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पनवेलमध्ये भरणार यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धा

राजेंद्र पाटील

पनवेल  : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली नियोजन बैठक पार पडली. 

उलवा नोडमध्ये झालेल्या या बैठकीस टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे,  सुर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, किशोर पाटील, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, मयूर कदम, विवेक होन, खारघर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत विविध स्पर्धा समितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, सीएम चषक त्यानंतर मागील वर्षी नमो चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंना वाव देणारी ठरली. नमो चषक २०२४ स्पर्धा राज्यातील प्रत्येक तालुक्यात संपन्न झाली.  त्या स्पर्धेत पनवेल विधानसभा मतदार संघात ०१ लाख १३ हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा २१ प्रकारात स्पर्धा झाल्या. यंदा नमो चषक २०२५ स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे. विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.  त्यामुळे या सर्व नमो चषक स्पर्धेचे यंदाही योग्य नियोजन व यशस्वी आयोजन झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक समितीने आपापल्या समितीचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी समित्यांना या बैठकीच्या माध्यमातून केली. 

Previous Post

ह.भ.प नारायण महाराज काळे यांचे मंगळवारी नेरूळमध्ये किर्तन

Next Post

नवी मुंबई महापालिका पत्रकार कक्षात पत्रकार दिन उत्साहात साजरा

Next Post
नवी मुंबई महापालिका पत्रकार कक्षात पत्रकार दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई महापालिका पत्रकार कक्षात पत्रकार दिन उत्साहात साजरा

बेलापूर मतदारसंघात भाजपा सदस्यता अभियानास सुरुवात

बेलापूर मतदारसंघात भाजपा सदस्यता अभियानास सुरुवात

मल:निस्सारणच्या दुर्गंधीचे पाणी अधिकाऱ्यांच्या दालनात पसरविण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मल:निस्सारणच्या दुर्गंधीचे पाणी अधिकाऱ्यांच्या दालनात पसरविण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com